घरताज्या घडामोडीNashik Accident : पुलावरून कार थेट कोसळली नदीपात्रात; तिघांचा मृत्यू, 7 जण...

Nashik Accident : पुलावरून कार थेट कोसळली नदीपात्रात; तिघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगावमध्ये नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळून भीषण अपघात (Car Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगावमध्ये नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळून भीषण अपघात (Car Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य केले. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. (nashik nandgaoun accident car fall from bridge to river)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली. जालना जिल्ह्यातील लग्न सोहळा आटोपून अपघात झालेले 10 जण परतत होते. त्यावेळी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातातील जखमींवर मालेगावमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हा अपघात नेमका कसा झाला?

जालना (Jalana) येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असताना नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून इको कार खाली नदीत कोसळली आणि अपघात झाला. भीषण अपघातात एका 4 वर्षीय मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडला.

- Advertisement -

(हेही वाचा – कर्नाटकातील म्हैसूरजवळ भीषण अपघात; बस आणि इनोव्हा कारची धडक, 10 ठार)

या अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यानं प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जम्मू-श्रीनगरमध्ये बस दरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटलीजवळ एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एक बस खड्ड्यात पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. तसेच, जखमींवर जम्मूच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर GMC जम्मूमध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -