घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रक्वॉलिटी सिटी’ म्हणून देशातील पाच शहरांत नाशिक

क्वॉलिटी सिटी’ म्हणून देशातील पाच शहरांत नाशिक

Subscribe

जनतेच्या सहकार्यातून नाशिक देशात बनणार नंबर वन पालकमंत्र्यांचा विश्वास

नाशिक : कुशल भारत मोहिमेअंतर्गत कौन्सिल ऑफ इंडिया व नॅशनल कौशल्य विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील संस्थांशी सामंजस्य करार केला जाणार असून, त्यातून ’क्वॉलिटी सिटी’ म्हणून नाशिकचा विकास केला जाणार आहे. यासाठी देशातील पाच शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली आहे.

क्वालिटी सिटी नाशिकच्या सुकाणू समिती ने पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. या बैठकीत क्वालिटी सिटी वर काम करण्याच्या बाबत पालकमंत्री यांनी दिशानिर्देश दिले. स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत नाशिक प्रथम क्रमांकावर येण्याचा मानस आहे. यासाठी क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया मदत करण्यात तयार आहे. शहराला लागून असलेल्या पाच गावे आदर्श गावांत सावरगाव आणि गंगावाडी सहित नवीन तीन गावे जोडले जातील. त्यासाठी हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांचा शाळा डिजिटल करण्याबरोबरच गळती थांबवण्यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले की, स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्री साठी नियोजन बद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांचा कौशल्य विकास कार्यक्रम आणि त्यांची नोदणी प्रक्रिया सुरू झाली असून त्या साठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्या सोबतच स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून शाळा, वॉर्ड, सर्व प्रशासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये स्वच्छता यावी व आपले शहर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा सर्व नागरिकांना मिळावी या साठी विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जाणार आहेत. शिक्षण अंतर्गत क्वालिटी सिटीची पहिली पायरी म्हणजे शाळेतून होणारी गळती रोखणे आणि बांधकाम कामगारांच्या मुलांची या महिन्याच्या अखेरीस शाळेत नोंदणी करणे असा असून घरगुती कामगारांच्या प्रशिक्षणालाही क्वालिटी सिटी मध्ये महत्त्व दिले जात आहे.

या प्रसंगी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे संचालक जितुभाई ठक्कर, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., उद्योजक हेमंत राठी , क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील , सचिन जोशी, निखिल पांचाळ, धनंजय बेले, अनंत रातेगावकर स्वरुपा व माजी उपमहापौर अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, प्रविण तिदमे , युवराज मोरे उपस्थित होते. या उपक्रमासाठी नाशिक महानगर पालिका ,नाशिक जिल्हा परिषद , क्रेडाई नाशिक मेट्रो ,नाशिक सिटिझन्स फोरम व श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार झाला आहे .

- Advertisement -

या गोष्टींचं विश्लेषण होणार?

घरेलू कामगार, वाहन चालक शिपाई आणि पर्यवेक्षक स्तरावरील व्हाईट स्कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतात घेण्यात येणार आहे. क्वॉलिटी सिटी नाशिक चळवळ यांत्रिक त्या त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राची परिस्थितीजन्य केले जाईल. त्यानंतर अडथळे आणि संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणारे प्रारुप आखले जाईल. कामगार जोडणीपासून घरकामगार रिक्षा चालक वाहन चालक शिपायांनी डिलिव्हरी बॉयपर्यंत गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. इतकेच नव्हे तर विचार असोसिएशन आणि निकम मानवी संसाधन प्रशिक्षणावर मध्यम स्तरीय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पहिला टप्पा यांच्यासाठी…

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक शहरातील घरेलू कामगार, वाहनचालक, शिपाई आणि सुपरवायझर स्तरावरील कर्मचार्‍यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. विकासाला गती देण्यासाठी तेथील बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून, पुढे तिचे देशातील अन्य शहरांमध्येही अनुकरण केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांचा विकास घडवणे हे या चळवळीचे उदिष्ट असून, त्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकाससह विविध शासकीय विभाग व अन्य संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -