घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआक्षेपार्ह लिखाणाबददल प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?; छगन भुजबळ यांचा सवाल

आक्षेपार्ह लिखाणाबददल प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?; छगन भुजबळ यांचा सवाल

Subscribe

नाशिक : महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरील आक्षेपार्ह लिखाण, महाराष्ट्र सदनातील फुले, होळकर यांचे पुतळे हटविण्याचा विषय याबाबत डॉ. प्रकाश आंबेडकर काहीच का बोलले नाहीत असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. महाराष्ट्र सदनातील पुतळे हटविण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याला प्रत्युत्तर देतांना भुजबळ यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेची कामे करायची असेल तर सत्तेत राहणेच कसे योग्य आहे असे लिखाण केले आहे. ते बहुधा प्रकाश आंबेडकरांनी वाचले नसावे असा टोला लगावला.

आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहोत असे सांगून संसदेतील पुतळे हलविण्याचा विषय असो वा आक्षेपार्ह लिखाणाच्या विषयावर आंबेडकर काहीच का बोलले नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुतळे हलविल्याच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन केल्यानंतर सरकारने त्याबाबत खुलासा केला आहे. आता हे कृत्य करणार्‍यांवर कारवाई करावी यासाठी येत्या अधिवेशनात जाब विचारण्यात येईल असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

गोंदे ते पिंपरी सदो महामार्ग होणार सहापदरी

नाशिक नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील वडपे ते गोंदे भागाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून गोंदे ते पिंपरीसदो या २० किलोमीटर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -