घरपालघरपालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 93.55 टक्के

पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 93.55 टक्के

Subscribe

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचा ९५.४५, पालघर तालुक्याचा ९३.३०, मोखाडा तालुक्याचा ८५.५२,वाडा तालुक्याचा ९१.३४, विक्रमगड तालुक्याचा ९०.३९, जव्हार तालुक्याचा ९१.५९, तलासरी तालुक्याचा ९१.५३ व डहाणू तालुक्याचा ८७.४४ टक्के निकाल लागला.

पालघर, माध्यमिक परीक्षा दहावीच्या निकालात पालघर जिल्ह्यातील 57 हजार 720 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 53 हजार 999 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 93.55 टक्के लागला आहे. यावर्षी सुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलींचे प्रमाण जास्त असून 95.26% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. वसई तालुक्याने उत्तीर्ण होण्यात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून 95.45% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघर जिल्ह्यातून 30 हजार 548 मुले व 27 हजार 172 मुली अशा 57 हजार 720 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यात 28 हजार 114 मुले व 25 हजार 885 मुली अशा एकूण 53 हजार 999 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 95.26 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 92. 03 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परिक्षेत पालघर जिल्हयात मुलींनी बाजी मारली. जिल्ह्याचा एकूण ९३.५५ टक्के निकाल लागला. त्यात मुली ९५.२६ टक्के तर मुले ९२.०३ टक्के इतकी आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचा ९५.४५, पालघर तालुक्याचा ९३.३०, मोखाडा तालुक्याचा ८५.५२,वाडा तालुक्याचा ९१.३४, विक्रमगड तालुक्याचा ९०.३९, जव्हार तालुक्याचा ९१.५९, तलासरी तालुक्याचा ९१.५३ व डहाणू तालुक्याचा ८७.४४ टक्के निकाल लागला.

वाडा तालुक्यातील 1475 मुले व 1298 मुली असे एकूण 2773 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 2533 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोखाडा तालुक्यात 601 मुले 539 मुली असे एकूण 1140 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 975 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विक्रमगड तालुक्यात 1024 मुले व 1130 मुली असे एकूण 2154 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 1947 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जव्हार तालुक्यातील 820 मुले व 928 मुली असे एकूण 1748 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 1601 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तलासरी तालुक्यात 1821 मुले व 1663 मुली असे एकूण 3 हजार 3484 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 3189विद्यार्थी उत्तीर्ण झाले. डहाणू तालुक्यातील 2351 मुले व 2420मुली असे 4771विद्यार्थी पैकी 4172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पालघर तालुक्यातील 4142 मुले व 3919 मुली असे एकूण 8 हजार 61 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 7521विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वसई तालुक्यात सर्वाधिक 18 हजार 314 मुले व 15 हजार 275 मुली असे एकूण 33 हजार 589 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यामधून 32 हजार 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.एकंदरीत 30 हजार 548 मुलांपैकी 28114 मुले व 27172 मुलींपैकी 25885 मुली उत्तीर्ण झाल्या असून एकूण 57720 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामधून 53999 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 95.26% आहे तर मुलांचे प्रमाण 92.03% आहे संपूर्ण जिल्ह्याचा निकाल 93.55% लागला आहे.

- Advertisement -

वि.पाटील विद्यालयाचा 86.56 टक्के निकाल

कुडूस येथील ह.वि.पाटील विद्यालयाचा निकाल 86.56 टक्के लागला आहे.वैदिक जाधव हा विद्यार्थी 90.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झाला आहे. तर प्रणव पाटील 90.40,देवश्री पाटील 90.20 हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुल शाळा अंभई या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून आपली 100 टक्के निकालाची परंपरा त्यांनी कायम राखली आहे. या शाळेची प्राची निपुर्ते ही विद्यार्थिनी 81.2 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर दिया सचिन पाटील 78.2, पूजा गडग 75 टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून 134 पैकी 134 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विनय जाधव 94.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. रोहन दामारे,ओम जाधव, अभिषेक पाल 91.80 हे विद्यार्थी दुसर्‍या क्रमांकाने तर शिवम यादव, वैभवी पाटील 91.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

- Advertisement -

सफाळे विभागात पूर्वा वैती सर्वप्रथम

ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे संचालित चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. पूर्वा निलेश वैती हिने एस.एस.सी.परीक्षेत 95.80% गुण संपादन करून सफाळे विभागात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. पूर्वाचे वडील निलेश वैती हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत तर आई मनीषा वैती ह्या निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत देखील पूर्वाने उज्ज्वल यश संपादन केले होते. इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.27% लागला असून 138 पैकी 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीत 47 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 72 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 15 विद्यार्थी तर पास श्रेणी 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राजगुरू पंडित विद्यालयाचा निकाल 95.80%
राजगुरू विद्यालयातील एकूण मुले 262 पैकी 251 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल 95.80% इतका लागला. विशेष प्राविण्य मिळविणारे 44 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 72 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 87 विद्यार्थी तर पास श्रेणीत 48 विद्यार्थी आहेत. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विलास पाटील,उपमुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी व पर्यवेक्षिका सुजाता घरत यांनी अभिनंदन केले आहे.

मीरा भाईंदरचा निकाल ९६.२२ टक्के )

भाईंदर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी ( उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ) परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी मीरा -भाईंदर शहराचा दहावीचा निकाल ९६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२३ दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी निकालाची प्रतीक्षा संपली. मीरा भाईंदर मधील १४८ शाळांमधून १०७५५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये १०३२७ विद्यार्थी पास झाले आहेत. निकाल चांगला लागल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -