घरमुंबईमहत्त्वाची बातमी : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम मार्गावर १४...

महत्त्वाची बातमी : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम मार्गावर १४ तासांचा ब्लॉक

Subscribe

 

मुंबईः मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम मार्गावर १४ तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे.  ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या वेळापत्रकानुसारच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिरा पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉक

ठाणे – वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

- Advertisement -

 

पश्चिम मार्गावर १४ तासांचा ब्लॉक

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान विशेष १४ तास वाहतूक ब्लॉक असणार आहे. वांद्रे ते गोरेगाव २०.०५.२०२३ रोजी २३.५५ तास ते २१.०५.२०२३ रोजी १३.५५ वाजेपर्यंत आणि २०.०५.२०२३ रोजी २३.३३ वाजेपासून गोरेगाव ते वांद्रे २१ .०५.२०२३ रोजी १४.०५ पर्यंत पर्यंत अप हार्बर मार्गावरील रद्द राहतील.

असे असेल वेळापत्रक

• गोरेगावसाठी शेवटची लोकल GN 83 गोरेगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस येथून २२.५४ वाजता सुटेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस शेवटची लोकल GN 86 असेल जी गोरेगावहून येथून २३. ०६ वाजता सुटेल .
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस साठी पहिली लोकल GN 48 असेल जी गोरेगावहून १४.३३ वाजता सुटेल.
• गोरेगावसाठी पहिली लोकल GN 45 असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस वरून १४.१८ वाजता सुटेल.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -