घरक्रीडाWTC Final: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार अंतिम सामना, लंडनच्या हवामानाची स्थिती काय?

WTC Final: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार अंतिम सामना, लंडनच्या हवामानाची स्थिती काय?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये पार पडणार आहे. ७ जून रोजी लंडनच्या ओव्हल मैदानावर दोन्ही संघांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारीने उतरणार आहेत. भारत दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. परंतु लंडनमधील पुढील पाच दिवसांच्या हवामानाची स्थिती काय असणार हे जाणून घेऊयात…

लंडनच्या हवामानाची स्थिती काय?

सामन्याच्या पहिल्या दिवशी हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल आणि पावसाची शक्यता नाहीये. तर दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता कमी प्रमाणात वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या दिवशी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चौथ्या आणि पाचव्या दिवशी हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, शेवटच्या दिवशी 1.4 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो असं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे – राहुल द्रविड 

भारतीय संघाने मागील 10 वर्षांपासून आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही. याशिवाय भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारतीय संघाला 2021 मध्ये साऊथॅम्पटन येथे न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकून आयसीसीचेही जेतेपद जिंकण्याचा दबाव भारतीय संघावर असणार आहे. मात्र राहुल द्रविड यांनी कोणतेही दडपण नसल्याचे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

राहुल द्रविड म्हणाला की, भारतीय संघावर आयसीसीचे विजेतेपद जिंकण्याचे कोणतेही दडपण नाही. ट्रॉफी जिंकण्याचा आनंद असतो त्याहून जास्त आनंद आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा असतो. भारतीय संघाने इथपर्यंत पोहचून दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ कमवले आहे. ऑस्ट्रेलियासोबत मालिका जिंकणे आणि इंग्लंडमध्ये मालिका अनिर्णित ठेवणे, अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. याशिवाय भारतीय संघ गेल्या 5-6 वर्षांत जगभर खेळला आहे. त्यामुळे आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे आतापर्यंत कमावलेले यश बदलणार नाही. पण यावेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे. क्रिकेटमधील कोणताही खेळ जिंकायचाच असतो, असे द्रविड म्हणाला.

भारतीय संघाने 2021 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळला होता. परंतु भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघाला जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्याची संधी आहे. कारण काही महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.


हेही वाचा : WTC फायनलमध्ये नवे नियम लागू; जाणून घ्या काय झाले बदल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -