घरमुंबईCruise Drugs Case : समीर वानखेडेंचा मोठा दावा; आर्यनला क्लीन चिट देण्यासाठी...

Cruise Drugs Case : समीर वानखेडेंचा मोठा दावा; आर्यनला क्लीन चिट देण्यासाठी एसआयटी स्थापन

Subscribe

मुंबई : ‘कॉर्डियिला क्रुझ’ अमलीपदार्थ सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचा (SIT) होता, असा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

समीर वानखेडे म्हणाले की, ‘कोर्डिलिया क्रूझ’ अमलीपदार्थ प्रकरणाबाबत आमच्या तपासावर शंका निर्माण करून नव्याने तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यामागे हेतू होता. अमलीपदार्थ प्रकरणात माझ्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासातील महत्त्वाची माहिती दडवून आणि वस्तुस्थिती वेगळी दाखवून आर्यन खानला क्लीन चिट देणे हाच उद्देश एसआयटी स्थापन करण्यामागे होता, असा दावा समीर वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  केला. (Cruise Drugs Case : Big Claim of Sameer Wankhede; SIT formed to give a clean chit to Aryan)

- Advertisement -

दरम्यान गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत समीर वानखेडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाला सांगितले की, वानखेडे आतापर्यंत सात वेळा चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात उपस्थित राहिले आहेत. त्यानंतर सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेसारख्या कठोर कारवाईपासून समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत असलेले अंतरिम संरक्षण खंडपीठाने आणखी दोन आठवडे वाढवून वानखेडेंच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 23 जून रोजी ठेवली.

वानखेडेंनी एनसीबीवरच केले गंभीर आरोप
आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून सोडवण्यासाठी 25 कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे आणि काही जणांवर एफआयआर  दाखल केल्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खंडणीखोरी केल्याच्या आरोपांबाबत वानखेडेंविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याने त्यांचे अंतरिम संरक्षण मागे घ्यावे, अशी मागणी सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात केली होती. मात्र वानखेडे यांनी हा एफआयआर खोटा असल्याचा दावा करत तो रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्यावरील आरोपांचे खंडन करतानाच एनसीबीवरच गंभीर आरोप केले.

- Advertisement -

सूडबुद्धीने माझ्याविरोधात अहवाल केल्याचे वानखेडेंनी म्हटले
कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यामुळे हे प्रकरणी खूप चर्चेत आले होते. त्यावेळी अनेक कारणांमुळे वानखेडे यांच्यावर खंडणी व लाचखोरीचे गंभीर आरोप केले. त्यानंतर नवी दिल्लीतील एनसीबी मुख्यालयातून एसआयटीची स्थापना करण्यात आली. जातीय छळाबाबत मी ऑगस्ट-२०२२मध्ये एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्यांचा माझ्यावर व्यक्तिगत राग होता आणि म्हणूनच एसआयटी स्थापन करून सूडबुद्धीने माझ्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला. माझ्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासाबाबत व माझ्या वर्तणुकीबाबत संशय निर्माण करून आर्यनला क्लीन चीट देण्यात आली असल्याचा दावा वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यनसोबत जो सेल्फी फोटो घेतला त्याला एनसीबीची संमती नव्हती. परंतु आर्यन हा सेलिब्रिटी असल्यामुळे अनेक जण त्याच्यासोबत फोटो घेत होते, असे स्पष्टीकरणही समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -