घरमहाराष्ट्रkolhapur Riot : खासदार धैर्यशील माने म्हणाले, नतद्रष्ट माणसाचं उदात्तीकरण झालं तर...

kolhapur Riot : खासदार धैर्यशील माने म्हणाले, नतद्रष्ट माणसाचं उदात्तीकरण झालं तर रस्त्यावरच…

Subscribe

 

कोल्हापूरः औरंगजेबाचं उदात्तीकरण झाल्यामुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला. आम्ही झालेल्या गोंधळाचं अजिबात समर्थन करत नाही पण नतद्रष्ट माणसाचं उदात्तीकरण झालं तर जनता रस्त्यावर उतरणारचं. काही विरोधी पक्षातल्या लोकांनी याबाबत काही विधाने केली आहेत, अशी प्रतिक्रिया हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर दंगलीवर दिली.

- Advertisement -

हेही वाचाःKolhapur violence : सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले…, मुख्यमंत्री शिंदेंची टीका

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्याच्या निमित्तानं एका नतद्रष्ट माणसाचं उदात्तीकरण करण्याचं काम नाही असामाजिक घटकांकडून करण्यात आलं. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूरमधील जनता रस्त्यावर उतरली. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला राजांबद्दल प्रेम आहेच पण कोल्हापूरकर जनता ही महाराजांच्या प्रेमात वेडी आहे, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

- Advertisement -

धैर्यशील माने म्हणाले, महाभारतात एक संजय होता. त्याला दिव्यदृष्टी होती जो महाभारत घडत असताना सांगत होता आणि इकडे एक संजय आहे ज्याच्यामुळे महाभोंगाकारण घडतंय. कोल्हापूर जनतेच्या अस्मितेला ज़र कोणी हात घातला तर जनता अजिबात ऐकणार नाही. संजय राऊत म्हणतात की, लोक बाहेरून आणण्यात आली होते; मी त्यांना एक आठवण करून देतो की, मोर्चामध्ये ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुद्धा उपस्थित होते. जनतेच्या मनामधल्या भावना या कोणा एका धर्माच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात होत्या.

औरंगाबादचे छ. संभाजीनगर करणं, उस्मानाबादचे धाराशिव करणं आणि अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर करणं हे बाळासाहेबांचं स्वप्नं होतं. बाळासाहेबांनी उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं होतं. बाळासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पण हे नामांतर काही लोकांना पटलेलं नसून त्यांच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळेच काही मुलांची मने कलुषित करण्याचं काम काही नेते करत आहेत, असा आरोप धैर्यशील माने यांनी केला.

राजकीय मतांचे धृवीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांनी काही वक्तव्य करून कोल्हापूरमधलं वातावरण अजिबात कलुषित करू नये .कोल्हापूरकर दंगल घडवायला कधीच प्रेरीत करत नाहीत. हे सगळं १ महिन्यापासून सुरु झालं, माझ्याकडच्या मतदार संघात भिडे गुरुजी हे टिपू सुलतानाला मुजरा करत आहेत असा फोटो वायरल करण्यात आला. आपल्या अभ्यासक्रमात तर औरंगजेब, टिपू सुलतान यांना हिरो ठरवण्याचं काम होत नाही ना ? मग या १७-१८ वर्षांच्या मुलांच्या मनात हे विष भरवतं तरी कोण? काही विरोधक कोल्हापूरमधील जनतेपर्यंत असा मेसेज पोहचवत आहेत की पुन्हा आमचं सरकार आलं की आम्ही पुन्हा नाव बदलू, अशी माहिती धैर्यशील माने यांनी दिली.

कोल्हापूरात जातीयवादाला थारा नाही

कोल्हापूरमध्ये जातीयवादाला कधीच थारा देण्यात येणार नाही. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही. पण सगळ्यात आधी कोल्हापूर शांत करणं जास्त महत्वाचं आहे. १० वर्षांपूर्वी मिरज येथे जी दंगल झाली त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सेनेचे ६ आमदार निवडून आले होते. वरीष्ठ नेते अजून पण आम्ही औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद हेच म्हणणार असल्याचं सांगतात, असा टोला धैर्यशील माने यांनी लगावला.

शरद पवारांना आलेल्या धमकीवर कारवाई होईल

शरद पवारांना आलेल्या धमकीबद्दल प्रश्न विचारला असता खासदार धैर्यशील माने म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे मोठे नेते आहेत त्यांना आलेल्या धमकीबद्दल शासन /सरकार लवकरात लवकर योग्य ती कारवाई करतील, असे धैर्यशील माने यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -