घरमहाराष्ट्रनाशिक२६ हजार एकर वनपट्टे; २५ जानेवारीला वाटप

२६ हजार एकर वनपट्टे; २५ जानेवारीला वाटप

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरगाण्यात कार्यक्रम

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आदिवासी बांधवांच्या वनहक्क दाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आतापर्यंत सुमारे ३० हजार ५३४ दावे निकाली काढण्यात आले आहेत. यातील पात्र दाव्यांमधील लाभार्थ्यांना २६ हजार ४९९ एकर क्षेत्राचे वाटप करण्यात येणार आहे. २५ जानेवारीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरगाणा येथे होणार्‍या कार्यक्रमात या वनपट्ट्यांचेे वाटप करण्यात येणार आहे.
वनहक्क दावे तातडीने निकाली काढावेत, या मुख्यमागणीसाठी आदिवासी बांधवांना वनपटटयांचे हस्तांतरण करावे, या मागणीसाठी नाशिक ते मुुंबई पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांबाबत सरकारने दावे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असून उपविभागीय समितीकडे ५० हजार ४४३ दावे प्राप्त झाले होते. समित्यांनी ३१ हजार ५३४ दावे अमान्य करून १८ हजार २३५ दाव्यांपैकी १७ हजार ५५१ दाव्यांना मान्यता दिली, तर ६८४ दावे अपात्र ठरविण्यात आले. पात्र दाव्यांतील लाभार्थ्यांना २६ हजार एकर क्षेत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

११५८ दावे प्रलंबित
जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या निपटार्‍यासाठी प्रशासनाकडून लगबग सुरू आहे. अपिलामध्ये असलेल्या 31 हजार 534 दाव्यांपैकी तब्बल 11 हजार 947 दावे पात्र केले असून 18 हजार 429 दावे अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, 1158 दावे प्रलंबित आहेत. महिनाअखेरपर्यंत त्यांचा निपटारा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -