घरमहाराष्ट्रनाशिकसातपूरला दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

सातपूरला दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

Subscribe

दुचाकीवरून ट्रिपलसीट निघालेल्या दुचाकीचालकाची ओव्हरटेकदरम्यान समोरुन येणाऱ्या दुचाकीशी झालेल्या अपघातात सातपूरच्या शिवाजी नगरातील दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २६ जानेवारीला सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत घडली.

सातपूर येथील महिंद्रा सर्कल येथून औद्योगिक वसाहतीकडे दुचाकीवरुन आशिष त्र्यंबक पाटील (२३, सातपूर कॉलनी) हा जात असताना ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्याच्या गाडीची सातपूरगावाकडून भरघाव येणाऱ्या महेश दत्तात्रय थेटे ( ३४, शिवाजीनगर, कार्बन नाका) याची दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात महेश थेटे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघाही दुचाकी चालकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी आशिष पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात झाला त्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. दरम्यान, वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट सक्ती आणि प्रबोधनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही, दुचाकीचालकांचे हेल्मेट वापराचे प्रमाण कमी आहे. यातूनच वर्षभरातील हा दहावा बळी गेल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -