घरटेक-वेकजावाची पेरक सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होणार

जावाची पेरक सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होणार

Subscribe

देशवासीयांच्या पसंतीला उतरलेली जावाची पेरक ही बाईक येत्या सप्टेंबर महिन्यात देशात लाँच होत आहे. जावा बाईक्स तयार करणारी कंपनी क्लासिक लेजंड्सचे संस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितल्याप्रमाणे पेरकची बुकिंग या वर्षाच्या अखेरीस सप्टेंबरच्या आसपास सुरू होईल. क्लासिक बॉबर थीम असलेल्या या बाईकची दिल्लीत एक्स शोरूम किंमत १.८९ लाख रुपये असणार आहे.

लाँचिंगनंतर पेरक भारतात पहिलीच खिशाला परवडेल अशी बॉबर बाईक असणार आहे. भारतीय बाजारात जावा पेरकला थेट टक्कर देणारी कोणतीही बाईक आजच्या घडीला उपलब्ध नाही. बाजारात या बाईकची स्पर्धा रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० आणि थंडरबर्ड ३५० सोबत असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

जावा पेरकमध्ये ३३४सीसी, डीओएचसी, लिक्विड-कूल्ड, ४ वॉल्व, फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ३०बीएचपीची ऊर्जा आणि ३१ एनएमची टॉर्क निर्माण करते. यामध्ये ६ स्पीड ट्रान्समिशन असणार आहे. या बॉबर स्टाईल बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएसचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -