घरमनोरंजनभाईंच्या 'विग' मागची गोष्ट

भाईंच्या ‘विग’ मागची गोष्ट

Subscribe

ही आहे भाईंच्या 'विग' मागची गोष्ट.

येत्या ८ फेब्रुवारीला भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. भाईंचा हा लूक हुबेहूब साकारण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे ते साळवी ब्रदर्सचे. सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातरपणापर्यंतचे विग ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ने बनवलेले आहेत.

यांनी केला विग डिझाइन

बॉलीवूडमध्ये गेली ३८ वर्ष काम करणाऱ्या सुरेंद्र साळवी आणि १६ वर्ष काम करणाऱ्या जीतेंद्र साळवी यांचा ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ बॉलीवूडच्या जवळ-जवळ ९५ टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन करत आहेत. जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या भाई, उरी आणि ठाकरे या मोठ्या सिनेमांसाठी त्यांनी विग डिझाइन केलेले आहेत.

- Advertisement -

भाई सिनेमासारखेच ठाकरे सिनेमासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीचा लूक डिझाइन करणे खूप चॅलेंजिंग असल्याचे जितेंद्र साळवी सांगतात, ‘नवाजुद्दीनचे कपाळ‘व्ही’ आकाराचे आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचे कपाळ सरळ आणि मोठे होते. त्यामुळे ‘ठाकरें’चा लूक देताना बॉल्ड कॅप, हेअर पॅसेचा वापर करून नवाजुद्दीन यांना लूक द्यावा लागला आहे.

‘भाईंच्या तरूणपणीच्या विगपेक्षा त्यांच्या म्हातरपणाचा विग जास्त कठीण होता. तरूणपणीचा विग ८ दिवसांमध्ये झाला तर म्हातरपणीचा विग व्हायला वीस दिवस लागले आहे. सर्वसाधारणपणे म्हातरपणी केस विरळ होत जातात आणि केसांची मुळंही दिसू लागतात. त्यात भाईंचे म्हातरपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत. तर लक्षात येईल की, त्यांचे केस कुरळेही असणे आवश्यक होते. त्यांच्या म्हातरपणीचा लूक डिझाइन करण्यासाठी आम्हांला तिरूपतीवरून केस मागवायला लागले. मग एक-एक केसांचा विग बनवला’ आहे.  – जितेंद्र साळवी, ‘नॅचरल हेअर स्टुडियो

- Advertisement -

वाचा – भाई’ एक पाऊल पुढे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -