घरमुंबईगाजरापासून लेझर

गाजरापासून लेझर

Subscribe

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

देशभरात संशोधन आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणारे लेझर आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता चक्क नैसर्गिक लेझर तयार करण्याची किमया भारतातील विद्यार्थ्यांनी आपल्या नावे केली आहे. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले असून जैविक साम्य पध्दतीने हे लेझर तयार करण्यात आलेले आहे. अत्यंत नैसर्गिक पध्दतीनेे हे लेझर तयार करण्यात आले असून डॉ. सी.व्ही. रामन यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे या लेझरचा शोध आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी लावला आहे. या लेझरचा वापर ऑप्टिकल स्पेस्क्ट्रोस्कोपीसाठी करण्यात येणार आहे. जगभरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे संशोधन करण्यात आले असून या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. देशभरातील विविध संशोधनात त्याचप्रमाणे डोळ्यांच्या विकारावर आणि इतर आरोग्याच्या समस्यांसाठी लेझरचा वापर केला जातो. पण बर्‍याच अंशी या लेझरमुळे दुष्परिणामांच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

या सर्वांची गंभीर दखल घेऊन आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या नवसंशोधनाची निर्मिती केली आहे. १९३० साली नोबल पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामन यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे या नवसंशोधकांंनी संशोधन केले आहे. संपूर्ण नैसर्गिकरित्या या लेझरची निर्मिती करण्यात आली असून जैविक साम्य पध्दतीने या संशोधनाचा वापर करण्यात आला आहे. जैव घटकांशी संवेदना जाणून घेण्यासाठी या लेझरचा वापर केला जाऊ शकणार आहे. वाढीव तापमानातदेखील या लेझरचा वापर सहज शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आयआयटी मद्रासच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सी.विजयन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवरम्मा कृष्णन, व्यंकेट्टा सिवा गुम्मालौरी यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. या संशोधनाबद्दल बोलताना प्रा. सी. विजयन म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ग्रीन आणि टिकाऊ वस्तूंपासून विविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून फोटोनिक तंत्रज्ञान सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्याच अनुषंगाने जैवतंत्रज्ञान वापरुन आम्ही हा प्रयोग केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. या संशोधनाबद्दल बोलताना व्यंकेटा गुम्मालौरी हिने सांगितले की, गाजरामध्ये असणार्‍या सेल्युलोझ आणि कॅरोटिनमुळे ताज्या गाजरातून लेझर येताना पाहणं हे आमच्यासाठी अतिशय उत्साहाचे आहे. गाजरामधील सेल्युलोझमुळे आणि त्यातील नैसर्गिक कॅरोटीनच्या अस्तित्वामुळे आम्हाला यशस्वीरित्या ही सीडब्ल्यू – लेझरची चाचणी करण्यात आली. त्याचेच रुपांतर अखेर आम्ही लेझरमध्ये केले असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधनाची वैशिष्ट्ये
* नैसर्गिक आणि संपूर्णतः जैवसंगत प्रणाली
* हाताळण्यासाठी आणि वापरण्यासाठी अतिशय सुलभ आणि सुरक्षित
* रामन व्हायब्रेशनल मोडद्वारे विशिष्ट तरंगानुसार लेझिंग मोड निश्चित केल्यावर तो मजबूत आणि अत्यंत विश्वसनीय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -