घरक्रीडाकेवळ एकदाच 'शून्यावर' आऊट झाला होता एबी

केवळ एकदाच ‘शून्यावर’ आऊट झाला होता एबी

Subscribe

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने २३ मे रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, आपण आता थकलो आहोत आणि इतरांना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेत असल्याचे सांगत एबी याने क्रिकेट जगताला अलविदा म्हटले.
मात्र १४ वर्षांच्या करियरमध्ये एबीने क्रिकेट जगतात आपला वेगळा ठसा उमटवला. त्याने खेळलेल्या कितीतरी खेळी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. एबीच्या चाहत्यांकरता अशाच काही अविस्मरणीय दिवंसापैकी आजचा दिवस आहे. आजच्याच दिवशी एबी शून्य रन्सवर आऊट झाला होता. आपल्या अखंड करीअरमध्ये एबी केवळ एकदाच शून्यावर आऊट झाला होता. त्याच्या या खेळीला ‘गोल्डन डक’ अशी उपमा देत आयसीसीने ट्विट केले आहे.

- Advertisement -

हेही रेकॉर्ड एबीच्या नावावर

एबी डिव्हिलियर्सने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात सर्वात वेगवान एकदिवसीय १५० रन्सची खेळी केली होती. यात त्याने केवळ ६४ बॉल्समध्ये १५० रन केले असून नाबाद १६२ रन्स केले होते. यात ८ सिक्स आणि १७ फोर्सचा समावेश होता.

abd
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स

एबीच्या आंतरराष्ट्रीय करीअरची एक झलक

एबी डीव्हिलियर्स याने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या १४ वर्षाच्या करियरमध्ये २२८ एकदिवसीय सामन्यात २५ शतकांसह ८,७६५ रन , ११४ कसोटी सामन्यात २२ शतकांसह ९,५७७ रन केले आहेत तसेच टी-२० मध्ये ७८ सामन्यात १६७२ रन बनविले असून १० अर्धशतकं आपल्या नावावर केली आहेत. सुरुवातीला विकेटकिपिंग करत असताना देखील एबीने उत्तम खेळ दाखवत १७ स्टम्पिंग केले आहेत तसेच विकेटकीपिंग आणि फिल्डिंग करत असताना तब्बल ४६३ झेल पकडले होते. या सर्वांसह त्याचे इंडियन प्रीमियर लीगमधील प्रदर्शन तर उल्लेखनीय आहे. रॉयल चॅलेंजर्स कडून खेळताना त्याने नवनवीन प्रकारचे शॉट्स खेळत सर्वाना अचंबित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -