घरमहाराष्ट्रग्रीन कॉरिडोरमधून सोलापूरहून ब्रेनडेड रुग्णाचे अवयव पुण्यात

ग्रीन कॉरिडोरमधून सोलापूरहून ब्रेनडेड रुग्णाचे अवयव पुण्यात

Subscribe

रिक्षाची धडक बसल्याने कृष्णाहरी होते बेशुद्धावस्थेत

सोलापुरातील भाजप कार्यकर्ता कृष्णाहरी सतय्या बोम्मा या ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान करून गुरुवारी दुपारी ग्रीन कॉरिडोरद्वारे अवयव पुण्याला रवाना करण्यात आले. कृष्णाहरी यांना रिक्षाची धडक बसल्यावर त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यामुळे ते बेशुद्धावस्थेत होते. गुरुवारी सकाळी ११ वाजता सिव्हिल रुग्णालयात त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. ४६ वर्षांचे कृष्णाहरी यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. यानंतर कृष्णाहरी बोम्मा यांच्या इतर काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. काहीतरी चमत्कार होईल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असा विश्वास त्यांच्या बोम्मा परिवार आणि डॉक्टरांना वाटत होता. मात्र गुरुवार सकाळपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आली नाही. यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

अवयवदानाच्या माध्यमातून जिवंत राहणार

भाऊ जरी गेला तरी तो अवयव दानाच्या माध्यमातून जिवंत राहावा, या उद्देशाने त्यांचे तीन भाऊ, भावजी सत्यम गुर्रम, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, सदानंद गुंडेटी व मित्र परिवारांनी त्यांच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाहरी बोम्मा यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -