घरमनोरंजनएका अनोख्या नात्याची गोष्ट  ‘मोलकरीण बाई’

एका अनोख्या नात्याची गोष्ट  ‘मोलकरीण बाई’

Subscribe

कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग म्हणजे घरची कामवाली बाई. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ येत आहे. १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका आपल्या भेटीला येईल.

‘अगं आज घरकाम करणाऱ्या बाई आल्याच नाहीत, माझं संपूर्ण दिवसाचं वेळापत्रकच कोलमडलं… खरंच गं माझ्या घरकाम करणाऱ्या मावशी आहेत म्हणून तर ऑफिसची कामं मी निश्चिंत मनाने करु शकते. हे आणि असे अनेक संवाद आपल्या नेहमी कानावर पडत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ येत आहे. १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका आपल्या भेटीला येईल.

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अश्या स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील.

- Advertisement -

खास बात म्हणजे उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत ‘मोलकरीण बाई’ ही मालिकेतून पहिल्यांदाच एका अनोख्या जगाची सफर घडणार आहे. तेव्हा या वेगळया जगाची सफर १८ मार्चपासून अनुभवायला सज्ज व्हा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -