घरमहाराष्ट्र५ सेकंदात नीरव मोदीचा १०० कोटीचा बंगला जमीनदोस्त

५ सेकंदात नीरव मोदीचा १०० कोटीचा बंगला जमीनदोस्त

Subscribe

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागमधील बंगला अवघ्या ५ सेकंदात जमीनदोस्त केला. अलिबाग तालुक्यातील किहीम येथे नीरव मोदीचा बंगला आहे. हा बंगला आज ३० किलो डायनामाइटचा वापर करुन पाडण्यात आला. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीच्या या बंगल्याची किंमत १०० कोटी आहे. या बंगल्याला तोडण्याचे काम २५ जानेवारीपासून सुरु होते. मात्र या बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्यामुळे या बंगल्याला पाडण्यासाठी डायनामाइट या स्फोटकाचा वापर करुन पाडण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

असा होता नीरव मोदीचा बंगला

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंगला अनधिकृतरित्या आणि तटीय नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आला होता. २०११ मध्ये नीरव मोदीला ३७६ स्क्वेअर मीटरमध्ये बंगला बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र या नियमाचे उल्लंघन करत नीरव मोदीने १०८१ स्क्वेअर मीटरपर्यंत हा बंगला बांधला. अनेक बेडरुम आणि हॉल असलेल्या या बंगल्यामध्ये पहिल्या मजल्यावर १००० स्क्वेअर मीटरचा स्विमिंग पूल होता. नीरव मोदीने या बंगल्याच्या बाहेर अवैधरित्या गार्डन बनवले होते.

रिमोटचा वापरुन बंगला पाडला

गुरुवारी नीरव मोदीच्या बंगल्यातील पिलरला होल पाडून डायनामाइट लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या डायनामाइटला रिमोटच्या सहाय्याने जोडण्यात आले होते. आज रिमोटच्या सहाय्याने हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला. या बंगल्याला पाडण्याच्याविरोधात ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ईडीने असे सांगितले होते की, हा बंगला पीएनबी घोटाळा प्रकरणात जप्त केलेली संपत्ती आहे. त्यानंतर तपास यंत्रणांनी या बंगल्याला स्थानिक प्रशासनानकडे सोपवले.

- Advertisement -

हायकोर्टाच्या आदेशावर झाली कारवाई

१ फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टात सांगितले होते की, नीरव मोदीच्या अलिबागमधील अनधिकृत बंगल्याला पाडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हायकोर्टाने अलिबागमध्ये अवैध बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर नीरव मोदी याचा हा बंगला पाडण्यात आला.

नीरव मोदी पीएनबी घोटाळ्यातला मुख्य आरोपी

नीरव मोदीवर मेहुल चौक्सीसोबत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी घोटाळा करुन देश सोडून फरार झाले. याप्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडीमार्फत सुरु आहे.

हेही वाचा – 

नीरव मोदीचा बंगला पाडण्यास सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -