घरदेश-विदेशदोन नाही एका दिवसापूर्वी करा आता तात्काळ तिकीट बुकिंग

दोन नाही एका दिवसापूर्वी करा आता तात्काळ तिकीट बुकिंग

Subscribe

होळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एका दिवसाअगोदर प्रवाशांना तिकीट बुकींग करता येणार आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वेने(IRCTC) प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. होळी सणाच्या निमित्ताने शहरात राहणाऱ्या अनेक लोकांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असते. आपल्या गावी जाऊन कुटुंबियांसोबत होळी साजरी करण्याची काही लोकांची प्रचंड इच्छा असते. तर काही लोकांना मिळालेल्या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असते. परंतु, बऱ्याचदा तात्काळ तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे लोक नाराज होतात. परंतु, आता लोकांना नाराज होण्याची आवश्यकता नाही. कारण, भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या सेवेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगला फायदा होणार आहे.

भारतीय रेल्वेने काय केले बदल?

आतापर्यंत प्रवाशांना जर तात्काळ तिकीट बुक करायचे असेल, तर त्यांना दोन दिवस अगोदर तिकीट बुक करावे लागत असे. तेव्हाच त्यांचे तिकीट आरक्षण मिळत असे. यामध्येही काही लोकांना मिळत असे, तर काहींना नाही. मात्र, आता रेल्वेने या सेवेमध्ये बदल केला आहे. जर प्रवाशांना तात्काळ तिकीटचे बुकिंग करायचे असेल, तर ते आता एकदिवस अगोदर तिकीट बुक करु शकतील. याचा अर्थ असा की, प्रवाशांनी एकदिवस अगोदर कुठे जाण्याचं ठरवलं तर त्यांना तिकीट उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

तिकीट खिडकी किंवा ऑनलाईन करु शकता बुक

भारतीय रेल्वेच्या कोणत्याही वेबसाईटवर प्रवाशी तिकीट बुक करु शकतात. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या तिकीट खिडकीच्या येथूनही प्रवाशी तिकीट मिळवू शकतील. प्रवाशांना जर एसी क्लासचे ( २ ए, ३ ए,सीसी, ३ई) तात्काळ तिकीट खरेदी करायचे असेल, तर त्यांच्यासाठी सकाळी १० वाजता तिकीट खिडकी रेल्वे स्थानकांवर उघडणार आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांना विना एसी क्लासचे (एसएल, एफसी, २ एस) तात्काळ तिकीट बुक करायचे असेल, तर त्यांच्यासाठी सकाळी ११ वाजता तिकीट खिडकी उघडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -