घरमहाराष्ट्रथकबाकीदारांच्या मालमत्तेचा पालिकेकडून २२ मार्चला लिलाव

थकबाकीदारांच्या मालमत्तेचा पालिकेकडून २२ मार्चला लिलाव

Subscribe

मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्यांविरोधात केडीएमसीने जोरदार मोहिम राबवली आहे. थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडीत केल्यानंतर त्यांची मालमत्ता लिलावात काढल्या आहेत.

मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्यांविरोधात केडीएमसीने जोरदार मोहिम राबवली आहे. थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडीत केल्यानंतर त्यांची मालमत्ता लिलावात काढल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेतील ९ मालमत्ता लिलावात काढण्याची नोटीस पालिकेने जारी केली असून येत्या २२ मार्चला दुपारी साडेतीन वाजता कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत समजला जातो. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत २८३ कोटी रूपये जमा झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेने थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मालमत्ता थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ता पालिकेने लिलावात काढल्या आहेत. ह प्रभाग समितीत सुमारे ९ मालमत्तांचा समावेश आहे. पालिकेचे एकूण दहा प्रभाग क्षेत्र असून प्रत्येक प्रभाग क्षेत्रातील थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. प्रत्येक मालमत्तांची कोटयावधी रूपयांची थकबाकी आहे. पालिकेकडून प्रथमच मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -