घरलोकसभा २०१९खडाजंगीमोदींविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तोगडिया रिंगणात

मोदींविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तोगडिया रिंगणात

Subscribe

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लढणार असून त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार घोषित केले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पक्ष ‘हिंदुस्थान निर्माण दल’ २६ जागा लढविणार असून तोगडिया यांनी आज उमेदवार जाहीर केले आहेत. तोगडिया स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लढणार असून त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मार्गदर्शकचे मूकदर्शक बनविल्याचा आरोप त्यांनी मोदींवर केला आहे. तसेच देशाची आर्थिक धोरण उद्योगपती घराण्यांसाठी बनविल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली आहे.

राम निवडणुकीपुरता आठवतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांत कधीही अयोध्येला गेले नाहीत. त्यांना रामापासून भीती वाटते का?, असा सवाल करत त्यांनी मोदींचा राष्ट्रवाद हा निवडणुकीपुरता आहे. राम तर त्यांना केवळ निवडणूक आली कीच आठवतो, असा आरोपही त्यांनी मोदींवर केला आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ५२ महिन्यांत हजराहून अधिक सैनिक शहीद झाले असून दर दिवशी जवान शहीद होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. देशभक्ती राष्ट्रवादापेक्षा मोठी असते. भाजपाचे काँग्रेसीकरण झाले असून आम्ही सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कंटाळून नवीन पक्ष बनविला आहे, असे देखील तोगडिया म्हणाले आहेत.

- Advertisement -

वाचा – ‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ प्रविण तोगडिया यांचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -