घरमहाराष्ट्रअॅड. प्रकाश आंबेडकरांची ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती

अॅड. प्रकाश आंबेडकरांची ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती

Subscribe

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार दि. २५ रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपाली संपत्ती ६ कोटी ७३ लाख रूपयांची दाखवली आहे.

वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल सोमवार दि. २५ रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज आणि काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची लोकसभा निवडणुकीत लढत रांगणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांनी आपाली संपत्ती ६ कोटी ७३ लाख रूपयांची दाखवली आहे.

स्थावर मालमत्ता 

सन २०१७ ते २०१८ मधील अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे उत्पन्न ८ लाख ६० हजार १९० तर पत्नीचे २१ लाख ०९ हजार १४० रुपये असल्याचे म्हटले आहे. अॅड. आंबेडकर यांच्या नावे ३२ लाख, पत्नी अंजलीच्या नावे १ कोटी १५ लाख तर सुजातच्या नावे ३ कोटी १५ लाख रुपयांपैकी पाचवा हिस्सा, अशी स्थावर मालमत्ता आहे. अकोल्यातील घर हे त्यांच्या स्वत:च्या नावे आहे. पुण्यातील घर त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. तर मुंबई, खार येथील घर हे सुजातच्या नावे आहे.

- Advertisement -

प्रतिज्ञापत्रकात दिलेली संपत्ती

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती दाखवली आहे. तसेच त्यातील ३ कोटी १५ लाखांची मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. तर १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे नमूद करण्यात आले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीच्या नावे वेल्हा तालुक्यातील ओसडे येथे जमीन आहे. तर त्यांचा मुलगा सुजातच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे येथे जमीन आहे. खुद्द त्यांच्या नावे गडचिरोली जिल्ह्यातील मुडसा येथे जमीन आहे, अशा प्रकारे संपत्ती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -