घरमहाराष्ट्रगेली पाच वर्ष तुम्ही कुठे होता; बैलगाडा शर्यतीसंबंधी डॉ. कोल्हेंना सवाल

गेली पाच वर्ष तुम्ही कुठे होता; बैलगाडा शर्यतीसंबंधी डॉ. कोल्हेंना सवाल

Subscribe

बैलगाडा शर्यत सहा महिन्यात सुरू करू आणि शर्यतीच्या पुढे घोडा घेऊन धावू म्हणणारे पाच वर्षे कुठे होते? असा सवाल शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना केला आहे

बैलगाडा शर्यत सहा महिन्यात सुरू करू आणि शर्यतीच्या पुढे घोडा घेऊन धावू म्हणणारे पाच वर्षे कुठे होते? असा सवाल शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना केला आहे. ते भोसरीमध्ये विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगेसह अनेक भाजपा-सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीवर युपीएच्या काळात बंदी

बैलगाडा शर्यत सहा महिन्यात सुरू करेल आणि शर्यतीच्या पुढे घोडा घेऊन धावेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकण येथील जाहीर सभेत केलं होतं. यावर शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून ते म्हणाले, बैलगाडा शर्यतीवर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात बंदी आली. नवखे उमेदवार विरोधी आहेत. बैलगाडा शर्यत सहा महिन्यात सुरू करेल आणि शर्यतीच्या पुढे घोडा घेऊन धावेल, असं सांगत आहेत. परंतु, तुम्ही गेली पाच वर्षे कुठे होतात, असा सवाल डॉ. अमोल कोल्हे यांना नाव न घेता आढळराव यांनी केला आहे.

- Advertisement -

जल्लीकट्टूसाठी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले

बैलगाडा शर्यती संदर्भात आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे आणि माझ्यावर केस झाली. तेव्हा तुम्हाला बैलगाडा शर्यतीचे आठवण झाली नाही का? चाकणमध्ये आंदोलनं झाली, सरकार ने कायदा मंजुर केला तेव्हा तुम्हाला काही सुचलं नाही का? असा प्रश्न विचारला गेला. जल्लीकट्टूसाठी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले, तुम्ही ही अभिनेते आहात कधी आंदोलनात सहभागी होण्याचा विचार केलात का अस आढळराव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -