घरमुंबई‘नांदा सौख्य भरे’

‘नांदा सौख्य भरे’

Subscribe

महिन्याला सहा आकडी पगार, आवडत्या व्यक्तीशी लग्न, घर-गाडी अशी प्रत्येक गोष्ट जवळ असणार्‍या ‘मिलेनिअम’ म्हणजे आजच्या काळातल्या नव्या पिढीला स्वत:चे लग्न टिकवण्यासाठी मात्र ‘मॅरेज कोच’चा आधार घ्यावा लागतो आहे. आपल्या आवडत्या प्रियकर-प्रेयसीशी लग्न होऊनही दररोजच्या ताणतणावात आणि धावपळीत जोडीदारासोबत ‘नांदा सौख्य भरे’ हे वाक्य त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरले आहे. याची अनेक कारणे आहेत, पण त्यातले सर्वात महत्वाचे आहे, जोडीदारासोबत वेळच व्यतीत न करणे.

लग्नानंतरच्या कुरबुरींना ‘भांड्याला भांडे लागणारच’ असे म्हणण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. आताची नवीन पिढी जुन्या पिढीइतकी एकमेकांशी जुळवून घेणारी नाही. त्यामुळे पारंपरिक मॅरेज काऊन्सिलिंग हे या पिढीसाठी पुरेसे ठरताना दिसत नाही. या पिढीला गरज आहे ती, मॅरेज कोचची. क्रिकेट खेळाडूला ज्याप्रमाणे प्रशिक्षक प्रत्यक्ष सूचना देऊन खेळाविषयी मार्गदर्शन करतो, अगदी त्याचप्रमाणे नवरा-बायकोलाही लग्नविषयक प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत ‘मॅरेज कोच’ लीना परांजपे यांनी मांडले. गेल्या तीन वर्षांत लीना परांजपे यांनी 180 हून अधिक जोडप्यांना मॅरेज कोचिंग दिले आहे.

- Advertisement -

पारंपरिक मॅरेज काऊन्सिलिंगच्या तुलनेत मॅरेज कोचिंग खूपच फोकस्ड असते. मॅरेज कोचिंग आणि मॅरेज काऊन्सिलिंग यांमधील फरक स्पष्ट करताना लीना परांजपे यांनी सांगितले की, ‘भूतकाळापासून मुक्त व्हा’, ‘तुमच्या भावनांवर चर्चा करा’ किंवा ‘या रिकाम्या खुर्चीशी गप्पा मारा’ यांसारखे काऊन्सिलिंगमधले प्रकार जोडप्यांना अनकम्फर्टेबल वाटतात आणि त्यातून काहीच साध्य होत नाही. समुपदेशनासारखी दीर्घकालीन आणि भावनिक ताण निर्माण करणारी उपचारपद्धती जोडप्यांना आवश्यक नसते. त्यांना फक्त गरज असते ती एका ‘कुशल सहकार्‍या’ची जो बुद्धीला पटेल अशी एक योजना आखेल, त्यांना काही कौशल्ये शिकवेल आणि योजना-कौशल्ये कृतीत उतरवण्यासाठी त्यांना जबाबदार धरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -