घरट्रेंडिंगरातोरात टिक-टॉक स्टार बनली औरंगाबादची विष्णूप्रिया

रातोरात टिक-टॉक स्टार बनली औरंगाबादची विष्णूप्रिया

Subscribe

टिक टॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवर खट्याळ हावभाव, अभिनय करत हिने अनेकांच्या मनावर छाप पाडली आहे.

सध्या तरुणाईला टिक टॉक अॅपने भुरळ घातली आहे. या अॅपमार्फत तरुण मुलं-मुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. या अॅपमुळे नवकलाकारांकरिता आपली कला सादर करण्याची एक संधीच मिळाली होती. अल्पावधीतच टिक टॉक अॅपचा वापर करून एका रात्रीत काही तरूण लोकप्रिय झाले आहे. त्यापैकीच औरंगाबाद मधील १९ वर्षाची विष्णूप्रिया नायर ही तरूणी. टिक टॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवर खट्याळ हावभाव, अभिनय करत हिने अनेकांच्या मनावर छाप पाडली आहे.

- Advertisement -

सामान्य माणसेच नाही तर बॉलिवूड विश्वातील रणवीर सिंग, सलमान खान, जॅकेलिन फर्नांडिस तसेच परिणीती चोप्रा देखील या अॅपवर सक्रीय असून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी या अॅपचा वापर करत असतात. सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्रातील औरंगाबादमधील विष्णूप्रिया नायरने ‘खुदा की इनायत’ या गाण्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. त्या एका व्हिडिओला १.८७ कोटीक्षा जास्त लाइक्स मिळाले असून दहा दिवसात २३ लाख चाहत्यांची संख्या झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ❤️SHIZUKA❤️ (@vishnupriya__14) on

- Advertisement -

यासोबत तिने अनेक बॉलिवूडमधील गाण्यांवर डबिंग केले, त्यापैकी तेरे लिये आणि आशियाना मेरा या दोन गाण्यांना लाखो लोकांची पसंती देत लाइक केले आहे. एका वृत्त अहवालानुसार, विष्णूप्रिया वाणिज्य शाखेतील शिक्षण घेत असून तिचे वडील औरंगाबाद मधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करतात.

हे वाचा – टिक टॉक भारतात बंद असले तरीही ते डाऊनलोड करता येते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -