घरदेश-विदेशअजब आश्वासन...सोने आणि दारु निम्म्या किंमतीत

अजब आश्वासन…सोने आणि दारु निम्म्या किंमतीत

Subscribe

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बकरा, महिलांना सोने आणि दारुचे भाव निम्मे करण्याचे अजब आश्वासन दिल्लीतील एका पक्षाने दिले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच निवडणूक म्हटले की प्रचारासाठी राजकीय पक्ष आश्वासनांचा पाऊस पाडतात. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध आश्वासने आणि प्रलोभने दिली जातात. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एका पक्षाने कहरच केला आहे. या ठिकाणाच्या एका पक्षाने मुस्लिमांना बकरा, महिलांना सोने आणि दारुचे भाव निम्मे करण्याचे अजब आश्वासन दिले आहे.

सांझी विरासट पक्षाचे आश्वासन

दिल्लीतील सांझी विरासट पक्षाचे उमेदवार अमित शर्मा यांनी आपल्या प्रचारा दरम्यान अजब आश्वासने दिली आहेत. सांझी विरासट या पक्षाचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून देशातील विविध भागात आमचे उमेदवार निवडणूक लढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

या दिवशी देण्यात येणार ही सुविधा

सांझी विरासट पक्षाने निवडणुकीसाठी जी आश्वासने दिली आहे त्यात म्हटले आहे की, ही सुविधा फक्त ईदच्या दिवशी दिली जाणार आहे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला फुकटात बकरा, महिलांना सोने आणि दारुचे भाव निम्मे करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मुलांना पीएचडीपर्यंत फुकटात फी माफी, विद्यार्थ्यांना मेट्रो आणि बसमधून फुकट प्रवास आणि खासगी शाळांमध्ये फ्रीमध्ये शिक्षण अशीही आश्वासने दिली आहेत. यासह अन्यही काही आश्वासने देण्यात आली आहेत.


वाचा – प्रचारात बिर्याणी विक्रेत्यांना अच्छे दिन

- Advertisement -

वाचा – ‘बिर्याणी’वरून तुफान हाणामारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -