घरमहाराष्ट्रमालेगावचे नगरसेवक नबी उल्ला यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

मालेगावचे नगरसेवक नबी उल्ला यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Subscribe

नबी उल्ला यांचे कृत्य पक्षशिस्त विरोधी असल्याने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी नबी उल्हा यांची पक्षातून हकालपट्टी केली.

पक्षशिस्त न पाळणारे मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक नबी अहेमद अहेमद उल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

मालेगाव विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आहेत. त्यांच्या विरोधात वंचित आघाडीतर्फे उभे राहू नका असे नबी अहेमद अहेमद उल्ला यांना पक्षाच्यावतीने सांगण्यात आले होते. परंतु पक्षाचे न ऐकता नबी उल्ला यांनी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

- Advertisement -

नबी उल्ला यांचे कृत्य पक्षशिस्त विरोधी असल्याने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांना त्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्याची सूचना केल्यानंतर हकालपट्टीची घोषणा करण्यात आली असे शिवाजीराव गर्जे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -