घरमुंबईमुंबईत ६वे 'मालवणी बोली साहित्य संमेलन'

मुंबईत ६वे ‘मालवणी बोली साहित्य संमेलन’

Subscribe

सहावे साहित्य संमेलन रविवार दि. २३ जून २०१९ रोजी दादर (पू.) येथील 'नायर समाज हाँल' येथे आयोजित करण्यात येणार आहे.

मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग आणि मुंबईतील ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने सहावे साहित्य संमेलन रविवार दि. २३ जून २०१९ रोजी दादर (पू.) येथील ‘नायर समाज हाँल’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. लवणी बोली  या सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनास जेष्ठ मालवणी साहित्यिक व कादंबरीकार प्रभाकर भोगले हे अध्यक्ष म्हणून असतील तर, मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डाँ. सुहास पेडणेकर हे उद्घाटक म्हणून निमंत्रित असतील.

अनेक मान्यवर उपस्थित

यासोबतच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नाटककार गंगाराम गवाणकर, महेश केळुस्कर, डाँ. सई लळीत, दिगंबर नाईक, अभिजित सावंत, लतिका सावंत, संजय नार्वेकर तसेच संभाजी सावंत, नितीन सांळुंखे, नजीर मुल्ला, प्रसाद गावडे, सतीश लळीत, नामदेव गवळी हे मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहे. ‘२०२० नंतरचा मालवणी मुलुख’, मालवणीतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती, ‘मालवणी काव्यसंमेलन’ यासारखे कार्यक्रम या मालवणी बोली साहित्य संमेलनात रसिकांना आस्वाद घेता येणार आहे.

- Advertisement -

नवोदितांना दिशादर्शक विचार 

‘जेष्ठ साहित्यिक कै. प्र. श्री. नेरूरकरनगरी’ असे संमेलन स्थळाला नांव देण्यात येणार असून ‘मर्तिक’ या धक्कादायक मालवणी कविता संग्रहामुळे चर्चेत आलेले अनियतकालिकातील कवी-कादंबरीकार चंद्रकांत खोत यांचे नाव व्यासपीठाला देण्यात येणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले. ‘वीना मानधन’ होणारे हे संमेलन मालवणीतून लिहिणा-या नवोदित लेखक – कवीना दिशादर्शक विचार देणारे असेल, असा विश्वास संयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

या संमेलनाचा प्रवेश निःशुल्क असून मर्यादित आहे. गिरणगावातील दिवंगत मालवणी चाकरमान्यांना हे संमेलन समर्पित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभागी होणाऱ्याचे मनापासून स्वागत आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क करावा.
९६६५९९६२६०/ ९८६९२८०६६०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -