घरमुंबईजेनेरिक औषधं देण्याची परवानगी द्या

जेनेरिक औषधं देण्याची परवानगी द्या

Subscribe

केंद्र सरकार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांना ब्रॅन्डेड औषधांऐवजी जेनेरिक औषध म्हणजेच स्वस्त पर्यायी औषध देण्याची सूचना केली आहे. पण, तरीही डॉक्टर रुग्णांना अनेकदा ब्रॅन्डेड औषधं लिहून देतात. त्यामुळे, फार्मासिस्टना जेनेरिक औषधं देण्याची परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

जेनेरिक औषधांच्या तुलनेत ब्रॅन्डेड औषधं खूप महाग आहेत. गरीब, आणि सामान्यांना ही औषधं परवडण्यासारखी नसतात. तरीही डॉक्टर ब्रँडेड औषध लिहून देतात. शिवाय, केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात देशभरातील सर्व केमिस्टना दुकानात एक सेपरेट जेनरिक औषधाचा रॅक करावा असे आदेश दिले आहेत. पण, त्यासोबतच केमिस्टना
जेनेरिक औषधं देण्याचा अधिकार द्यावा, अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

- Advertisement -

” फार्मसिस्टला मिळाला पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार द्यावा. फक्त सरकारी जनऔषधी नव्हे तर भारतातील सर्व फार्मासिस्ट(केमिस्ट) यांना स्वस्त पर्यायी औषध देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ” – कैलास तांदळे,अध्यक्ष , महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन

शिवाय, केंद्राच्या अन्न व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४५ नियम ६५ उपनियम ११-अ मध्ये बदल करून द्यावा म्हणजे जनतेला स्वस्त ,किफायती पण, गुणकारी औषधी मिळतील‌. त्यामुळे, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाला स्वस्त,पर्यायी आणि गुणकारी औषध देण्याचा अधिकार फार्मासिस्टला मिळायला हवा असं ही तांदळे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -