घरफिचर्सप्रतिसाद: पोस्ट कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिर्वाय करा

प्रतिसाद: पोस्ट कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिर्वाय करा

Subscribe

पत्रव्यवहार मराठीच अपेक्षित                                                                                                  केंद्र शासनाच्या महाराष्ट्र सर्कल पोस्ट कार्यालयातील अधिकारीवर्गाला मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि मराठी मातीचा मोठ्या प्रमाणात विसर पडला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भांडुप (पश्चिम) येथील एल.बी.एस.मार्गावरील ईश्वर नगर परिसरातील पोस्ट मास्तर कार्यालयाशी तक्रारींची दाखल घेण्यासंदर्भात मराठी भाषेत पत्रव्यवहार करण्यात आला होता. बेशिस्त आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकार्‍यांवर आळा बसवा तसेच पोस्ट कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भांडुप पोस्टमास्तर कार्यालयात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यासाठी केंद्र शासनाच्या महाराष्ट्र सर्कल व मुंबई जी.पी.ओ.जनरलचे मुख्य पोस्ट मास्तर एच.सी.अग्रवाल यांच्याकडे मराठी भाषेत लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु केंद्र शासनाच्या मुंबई जी.पी.ओ.जनरल पोस्ट कार्यालयाने मराठी पात्राला इंग्रजी भाषेत पोस्टद्वारे प्रतिउत्तर पाठविले आहे. पोस्ट कार्यालयाच्या या कृतीचा प्रचंड संताप होत आहे. या प्रकारामुळे पोस्ट मास्तर कार्यालयातील अधिकारी वर्गाला मराठी भाषेचे वावडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठी भाषेचे वावडे असणार्‍या अधिकार्‍यांची शासकीय सेवेतून त्वरीत हकालपट्टी करावी. जर केंद्र शासनाच्या मुंबई जी.पी.ओ.जनरल पोस्ट मास्तर कार्यालय तसेच भांडूप पोस्ट मास्तर कार्यालयात पत्रव्यवहार मराठी भाषेत झालेला असेल किंवा होत असेल तर त्याचे उत्तरसुध्दा मराठी भाषेतच देण्यात यावे, याची दखल संबंधित कार्यालयाने घ्यावी.                                        गणेश वराडे रमाबाई नगर, भांडुप(पश्चिम)

सर्वांगीण सरस
‘आपलं महानगर’ या लोकप्रिय दैनिकाचा मी नियमित वाचक आहे. आपल्या दैनिकात नाशिक, ठाणे, पालघर, भिवंडी, वसई, पुणे आदी ठिकाणच्या विश्वसनीय बातम्या असतात. शिवाय राजकीय बातम्यांचे कुरुक्षेत्र सदर, त्याचबरोबर विश्व विशेष, स्त्रियांसाठी मुक्ता सदर, वाचकांची पत्रे, राशीभविष्य, नाट्य विषयक बातम्या, रोज पाच जणांना बक्षीस देणारे शब्दकोडे आदीमुळे दैनिक दर्जेदार वाटते. विशेष म्हणजे सडेतोड निर्भीड संपादकीय वाचनीय असते. करंट इश्यू ऐवजी चालू घडामोडी व स्पोर्ट्स ऐवजी क्रीडा विश्व/क्रीडा जगत असा उल्लेख करावा असते वाटते. आपल्या दैनिकाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.                                                                                                              सुरेंद्र तेलंग, गिरगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -