घरमुंबईठाण्याच्या बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून धोका

ठाण्याच्या बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून धोका

Subscribe

ठाणे बाजारपेठेनजीक असलेल्या खारकर आळीत १८ जून रोजी फेरीवाल्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. पुन्हा दोन दिवसांनी या गाड्या फेरिवाल्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या आढळून आल्या. त्यामुळे महापालिकेची कारवाई दिखावा ठरली आहे. या परिसरात आजूबाजूला मोठी कापडाची दुकाने आहेत. फेरिवाल्यांकडे गॅसचे सिलिंडर आहेत. या ठिकाणी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास जिवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे.

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेनजीक असलेल्या खारकर आळीत रुपकन्या इमारतीच्या आवारात डोसा, सॅन्डवीच, पानीपुरीच्या गाड्या लागलेल्या आहेत. ही जागा खासगी असल्याने महापालिकेकडून केवळ दिखावा म्हणून कारवाई करून खाद्यपदार्थांची वाहने उचलण्यात आली. त्यानंतर ही वाहने पुन्हा संबंधितांना देण्यात आली.

- Advertisement -

या जागेचा वाद मागील अनेक वर्षापासून न्यायालयात प्रलंबित आहे. यावर न्यायालयाने जोपर्यंत या वादाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने जागेवर अतिक्रमण करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी फेरीवाल्यांना धंदा करण्याकरिता या जागा भाड्याने दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर या फेरीवाल्यांना वीजजोडणीही देण्यात आली आहे. ज्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या गाड्या बिनदिक्कतपणे सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -