घरट्रेंडिंग‘मराठी बिग बॉस २’ मधील नवे चेहरे!

‘मराठी बिग बॉस २’ मधील नवे चेहरे!

Subscribe

असं एक घर ज्याने तमाम प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना आपलंसं केलं. एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलं. ज्याने सदस्यांचे रडणं-हसणं पाहिलं. ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं…आता ते घर पुन्हा सेलिब्रिटींनी गजबजणार आहे. नवे आणि अंतरंगी सदस्य घेऊन तुमचं मनोरंजन करायला, तुमची मने पुन्हा जिंकायला मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिअ‍ॅलिटी शो म्हणजेच मनोरंजनाचा तिसरा डोळा मराठी बिग बॉस-सिझन २ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या घरात विविध क्षेत्रातील १५ कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला आले आहेत. हे १५ कलाकार त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच १०० दिवस एका अनोळखी जागी ७५ कॅमेर्‍यांच्या नजरकैदेत राहणार असून त्यांचा हा प्रवास कसा असेल हे आता पाहायला मिळणार आहे. रविवार, २६ मे रोजी या रिअ‍ॅलिटी शोचे ग्रँड लाँचिंग होणार असून कलर्स मराठी वाहिनीवर दररोज सात्री साडेनऊ वाजता हा शो दाखवला जाणार आहे. या सिझनमधील सेलिब्रिटी कोण आहेत, जाणून घेऊया.

शिवानी सुर्वे

‘तुमच्यासाठी कायपण…’ हा डायलॉग जिच्यासाठी बोलला जायचा अशी फेम ‘देवयानी’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुर्वे. अभिनेत्री शिवानी आता प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस आली आहे. मात्र ही कोणत्या मालिकेतून नाही तर चक्क मराठी बिग बॉस-सिझन २ मधून. देवयानी या मालिकेत शिवानीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती अत्यंत चांगली आणि सोज्वळ अशी भूमिका तिने साकारली होती. मात्र आता तिचा प्रत्यक्षात स्वभाव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

मराठी बिग बॉस-१ सिझनला मला ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यावेळी मला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यावेळी नकार दिला होता. मात्र यावेळी मला ही पुन्हा संधी मिळाली असून या संधीचा मी स्विकार केला आहे.


वीणा जगताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जिने काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली, अशी राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील फेम राधा देशमुख म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री वीणा जगताप हिने मराठी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. याआधी बिग बॉस-सिझन १ मध्ये पाहुणे म्हणून राधा प्रेम रंगी रंगलीमधील कलाकार स्पर्धकाच्या भेटीस आले होते. या कलाकारांसोबत बिग बॉसचे बीबी हॉटेलमध्ये रुपांतर करून सिझन १ मधील स्पर्धकांनी त्यांचा चांगला पाहुणचार केला होता. त्यावेळी वीणा ही पाहुणी म्हणून आली होती. मात्र, आता ती सिझन २ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे.

- Advertisement -

सुरेखा पुणेकर

मराठी बिग बॉस – २ सिझन सुरू होण्याआधी अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या प्रोमोमध्ये घुंगरु आणि लावणीचा फड दाखवण्यात आला होता. त्यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. ही शक्यता अखेर खरी ठरली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मराठी बिग बॉस – २ सिझनमध्ये प्रवेश केला आहे. लावणी सादर केल्यानंतर प्रेक्षक त्यांना शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून सादरीकरणाला दाद देतात. मात्र, आता त्यांच्या बिग बॉसमधील स्पर्धकाला त्यांना प्रेक्षक कशी दाद देणार ते पाहावं लागणार आहे.

बिग बॉसच्या घरात जाणे हा माझा टर्निंग पॉइंट आहे. मला या घरात जाऊन माझा जीवन प्रवास मला माझ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगायचा असून ही माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. तसेच या घरात राहून मला खूप खेळ खेळायचे असून मी या घरातील भांडणाला घाबरत नाही. कारण वाद घालणे हे माझ्यासाठी कठीण नाही.


अभिजित केळकर

‘फुलपाखरु’ या मालिकेतील अभिनेता अभिजित केळकरने मराठी बिग बॉस-२ सिझनमध्ये प्रवेश केला आहे. अभिजितने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत काम केले आहे. बर्‍याचदा त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता सिझनमध्ये त्याची रिअल लाईफ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मी जसा आहे, तसाच राहणार आहे. मालिकांमधून प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलेच आहे. मात्र आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मी प्रेक्षकांचे मन जिंकणार असून मी खर्‍या आयुष्यात कसा आहे ते आता प्रेक्षकांना कळणार आहे.


किशोरी शहाणे

मराठी आणि हिंदी चित्रपटांतून काम केलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ पासून आपली रुपेरी वाटचाल सुरू केली. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी रुपेरी पडद्यावर घालवला असला तरी त्या आजच्या पिढीच्या तारखेच्या स्पर्धेत कार्यरत आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ‘ऐका दाजिबा’ यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअ‍ॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षे त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग असून आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये तर टिकाव धरला आहे. मात्र आता त्या बिग बॉसमध्ये कसा टिकाव धरणार ते पाहावं लागणार आहे.

मी आतापर्यंत झालेले बिग बॉसचा एकही कार्यक्रम पाहिला नाही. मात्र, माझी आई या बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोची फॅन आहे. तिने मला या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मी या शो मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.


वैशाली भैसने-माडे

सुगम संगीत गायिका वैशाली भैसने-माडे यांनी बिग बॉस-सिझन २ मध्ये प्रवेश केला आहे. दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून त्या विजेत्या ठरल्या असून आता त्या बिग बॉसमध्ये काय कमाल करणार ते पाहावं लागणार आहे.


सर्वांशी मी चांगलाच वागतो. तसाच मी या बिग बॉसच्या घरात देखील वागणार आहे. मात्र जे माझ्याशी वाईट वागतील त्यांच्याशी मी देखील वाईटच वागणार.

– माधव देवचक्के, अभिनेता

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -