घरमुंबईडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही डॉक्टरांना अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही डॉक्टरांना अटक

Subscribe

नायर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिनही डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी अट केली आहे.

नायर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केल्यानंतर बुधवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांकडून इतर दोन महिला आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि अंकिता खंडेलवाल या तिनही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींवर आज शिवडी कोर्टात हजर करण्यात येणार असून आज त्यांच्यावर सुणावणी होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

डॉ. पायल तडवी या नायर हॉस्पिटलमध्ये पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. हॉस्पिटलच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरुन डॉ. पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी डॉ. पायलने वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन डॉ. पायल यांनी आत्महत्या केली.

- Advertisement -

आत्महत्या नसून हत्या?

डॉ. पायल तडवी प्रकरणावरुन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. डॉ. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारी नायर हॉस्पिटलच्या आवारात अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत पायलच्या न्यायासाठी निषेध व्यक्त केला आहे. डॉ. पायल तडवी हिला न्याय मिळाला पाहिजे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. डॉ. पायलची आत्महत्या नसून हत्या असल्याचा देखील आरोप केला जात आहे.


वाचा – डॉ. पायल तडवी प्रकरण; नायर रुग्णालयाबाहेर निषेध


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -