घरलाईफस्टाईलएण्डोकार्डिटिस होण्याची 'ही' आहेत कारणं

एण्डोकार्डिटिस होण्याची ‘ही’ आहेत कारणं

Subscribe

शरीराच्या कोणत्याही भागातून जंतू रक्तप्रवाहात मिसळून हृदयाच्या एखाद्या भागात शिरल्यामुळे हा आजार होतो.

हृदयाच्या अस्तराच्या सर्वांत आतील स्तराचा तसेच हृदयातील झडपांना सूज येण्याच्या अवस्थेला एण्डोकार्डिटिस असे म्हटले जाते. रुग्णाच्या शरीराच्या अन्य कोणत्या भागातून म्हणजे घशाला झालेला प्रादुर्भाव, दातांना झालेला प्रादुर्भाव किंवा मूत्रमार्गात झालेल्या प्रादुर्भावातून जीवाणू, बुरशी किंवा अन्य जंतू रक्तप्रवाहात मिसळून हृदयाच्या एखाद्या भागात शिरल्यामुळे हा आजार होतो.

याचे इन्फेक्टिव एण्डोकार्डिटिस (आयई), बॅक्टेरियल (जीवाणूजन्य) एण्डोकार्डिटिस (बीई), इन्फेक्शिअस एण्डोकार्डिटिस आणि फंगल एण्डोकार्डिटिस असे प्रकार आहेत. या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर हृदयाच्या झडपांची हानी होऊ शकते त्यामुळे त्यांच्या कामात बिघाड होऊ शकतो.

- Advertisement -

एण्डोकार्डिटिसची काही कारणं

  • हुळहुळ्या त्वचेसारख्या एखाद्या प्रादुर्भाव झालेल्या भागातून जीवाणू पसरू शकतात. याशिवाय हिरड्यांचे विकार, लैंगिक संबंधांतून वहन झालेला प्रादुर्भाव किंवा इनफ्लेमेटरी बॉवेल डिसीजसारख्या आतड्यांच्या विकारामुळे जीवाणू रुग्णाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  • टॅटूइंग किंवा बॉडी पिअर्सिंगसाठी वापरलेल्या सुयांमार्फत एण्डाकार्डिटिसला कारणीभूत ठरणारे जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  • दूषित सुया व सिरिंजेसमुळेही हा विकार होऊ शकतो. हेरॉइन किंवा कोकेनसारखे बेकायदा अमली पदार्थ घेण्यासाठी इंट्राव्हेन्युअस अर्थात आयव्ही वापरणाऱ्यांना याचा अधिक धोका असतो. अशा प्रकारचे अमली पदार्थ घेणाऱ्यांना सहसा स्वच्छ, न वापरलेल्या सुया किंवा सिरिंजेस उपलब्ध होत नाहीत.
  • काही दंतवैद्यकीय प्रक्रियांमध्ये हिरड्यांना छेद दिला जातो. यामुळे जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.

एण्डोकार्डिटिस आजाराची लक्षणे

  • एखाद्याला एण्डोकार्डिटिस अचानक होतो किंवा हळुहळू होत जातो. तो कोणत्या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो यावर हे अवलंबून आहे.
  • त्याचप्रमाणे रुग्णाला कोणते सुप्त हृदयविकार आहेत यावरही एण्डोकार्डिटिस अवलंबून असतो.
  • काही जणांना आधीपासूनच हृदयाचे स्नायू आकुंचन पावण्याचा किंवा झडपांतून गळतीचा विकार अगदी सौम्य किंवा मध्यम स्वरूपात असणाऱ्यांना एण्डोकार्डिटिस होण्याची शक्यता अधिक असते.
  • ताप, थंडी भरणे, थकवा येणे, रात्रीच्या वेळी घाम येणे, श्वास घेण्यात अडचण येणे, स्नायू व सांधे दुखणे, श्वास घेताना छाती दुखणे, पावले-पाय किंवा पोटाला सूज येणे.
  • तसेच कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे, लघवीतून रक्त जाणे, प्लीहांमध्ये नरमपणा जाणवणे आणि ऑस्लर्स नोड्स ही लक्षणे आढळतात.

(एण्डोकार्डिटिस : भाग- १ | डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिक सर्जन, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -