घरमुंबईडॉक्टरांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात डॉक्टरांची 'Save Doctor's मोहीम

डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात डॉक्टरांची ‘Save Doctor’s मोहीम

Subscribe

कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. डॉ. परिबहामुखोपंध्याय आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली.

कोलकात्यातील निवासी आणि इंटर्न अशा दोन डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी #savethedoctor अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसंच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढलं आहे.

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण

डॉक्टरांना मारहाण होण्याच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात वाढ होत असताना आता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. डॉ. परिबहामुखोपंध्याय आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. जवळपास २०० लोकांनी या दोन्ही डॉक्टरांना मारहाण केल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

सरकारला अपयश

शिवाय, सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं या डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.

आमचा संयम संपला

सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का? असा सवाल मार्डने उपस्थित केला आहे. आमच्या सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून आम्ही थकलो आहोत. आता आमचा संयम संपलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला आहे. तर कोलकाता सरकार आणि पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील हॉस्पिटलची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -