घरदेश-विदेशमुख्यमंत्री कमलनाथांकडून शहीद जवानाच्या कुटुंबियांना एक कोटी अर्थिक मदतीची घोषणा!

मुख्यमंत्री कमलनाथांकडून शहीद जवानाच्या कुटुंबियांना एक कोटी अर्थिक मदतीची घोषणा!

Subscribe

सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. यासाठी सरकार सैनिक कुटुंबियांच्या मागे ठामपणे राहणार.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील दहशदवादी हल्यात संदीप यादव शहीद झाले. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शहीद संदीप यादव यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची अर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून घर आणि सरकारी नोकरी देण्यात येणार असंही कमलनाथ म्हणाले.

मुख्यमंत्री, कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीर येथे दहशहवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप यांना अर्थिक मदत मिळालीच पाहिजे. प्रत्येक सैनिक त्यांच्या जीवाची पर्वा न करता, आपल्यासाठी सीमेवर लढत असतात. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. यासाठी सरकार सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभे राहणार.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर येथे बुधवारी अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात ५ सैनिक शहीद झाले. यामध्ये मध्य प्रदेशातील जवान संदीप यादव हे देखील होते. शहीद संदीप यादव देवास जिल्ह्यातील कुलाला गावातील रहिवाशी होते. संदीप हे सीआरपीएफच्या ११६ बटालियनमध्ये तैनात होते. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथे ११६ बटालियनमधील सैनिकांना तैनात करण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -