घरमुंबईअल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीची दिंडोशी कोर्टात आत्महत्या

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीची दिंडोशी कोर्टात आत्महत्या

Subscribe

पवई येथील एका ५ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार आणि पोस्कोच्या गुन्ह्यात २०१५ मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीने आज दिंडोशी सेशन कोर्टात आत्महत्या केली. आरोपीचे नाव विकास पवार असून आज त्याला आर्थर रोड तुरुंगातून सुनावणीसाठी दिंडोशी सेशन कोर्टात आणण्यात आले होते. यावेळी त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

आरोपीला कोर्टात आणले असता त्याने सोबत असलेल्या पोलीस गार्डचा हाताला झटका देऊन सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. विकास पवार हा घाटकोपर येथे राहणारा होता. या घटनेनंतर कुरार पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करत मृतदेह गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -