घरहिवाळी अधिवेशन २०१८मराठा आरक्षण: सत्ताधारी - विरोधक आमदार एकमेकांच्या अंगावर

मराठा आरक्षण: सत्ताधारी – विरोधक आमदार एकमेकांच्या अंगावर

Subscribe

मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर हिवाळी अधिवेशनातील वातावरण आणखी तापले आहे. मराठा-धनगर-मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरुन आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विधानपरिषदेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानपरिषदेतील सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसले असताना विरोधकही तिथे घोषणाबाजी करत आले. त्यानंतर काही काळ दोन्हीकडील आमदार एकमेकांच्या अंगावर ओरडून घोषणाबाजी करताना दिसले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बेठकीतील भूमिका

आतापर्यंत ५१ अहवाल आघाडी सरकारने सादर केलेले आहेत. त्यापैकी एकही अहवाल सभागृहात ठेवलेला नाही. तर त्याचा अॅक्शन टेकन रिपोर्ट ठेवलेला आहे. हा ५२ वा अहवाल आहे. त्यामुळे आम्ही अहवाल पटलावर का ठेवावा? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांना करत अहवाल मांडायला विरोध केला आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे. त्यामुळेच ते अहवाल मांडण्यास सांगत आहेत. सरकार सध्या मराठा समाजाच्या अहवालावर अभ्यास करत आहे. धनगर-मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्यासाठी सरकार कटिब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणात अडथळा आणण्याची आमची भूमिका नाही – अजित पवार

मराठा आरक्षणाचे श्रेय मिळणार नाही म्हणून विरोधकांचा तिळपापड

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक एक – दोन दिवसांत मांडले जाणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे श्रेय आपल्याला मिळणार नाही म्हणून विरोधकांचा तीळपापड झालेला आहे. पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण कसे होईल? आरक्षणात अडथळा कसा आणता येईल? असा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत ५१ अहवाल तयार झालेले आहेत, त्यातील एकही अहवाल सभागृहात ठेवलेला नाही. तर त्याचा अॅक्शन टेकन रिपोर्ट ठेवला गेलेला आहे. त्यामुळे विरोधकांना अहवालाच्या आडून मराठा आरक्षणात अडथळा आणायचा असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.

आम्ही आरक्षणावर ठाम; अडथळा आणू नका – मुख्यमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -