घरभक्तीCOLOUR AND NATURE- रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव

COLOUR AND NATURE- रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव

Subscribe

रंग म्हणजे अंतर्मन असे म्हटले जाते. कारण रंगाचा थेट संबंध हा व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. प्रत्येक रंग त्या त्या व्यक्तीबद्दल सांगत असतो. म्हणूनच तर तुम्ही कसे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालता कोणता पेहराव करता यावरून तुमचे व्यक्तीमत्व ओळखले जाते.

पांढरा रंग

- Advertisement -

पांढरा रंग हा शांततेचे प्रतिक मानला जातो. डोळ्याला आणि मनाला शांततेचा फिल देणारा पांढरा रंग हा बहुतेक वेळा शांत स्वभावाच्या व्यक्तींची पसंत असते. अशी लोक प्रचंड आशावादी असतात. तसेच दूरदृष्टी ठेवून जगण्याकडे त्यांचा कल असतो. गर्दीपासून दूर एकांतात किंवा ठराविक व्यक्तींच्या सा्न्निध्यात राहणे यांना आवडते.

लाल रंग

- Advertisement -

लाल रंग हा उर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून ओळखला जातो. लाल रंग आवडणाऱ्या व्यक्तीही तशाच उर्जावान असतात. लाल रंग पट्कन समोरच्याला आकर्षित करतो. यामुळे हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती ही दिसायला आकर्षक असतात. समोरच्यावर छाप पाडणारे यांचे व्यक्तीमत्व असते. पण या स्वभावाने रागीट असतात. पण तरीही मनाने मृदू असतात.

हिरवा रंग
हिरवा रंग हा संपन्नतेचा प्रतिक आहे. यामुळे हा रंग आवडणाऱ्या व्यक्तीही परिपूर्ण आणि संपन्न व्यक्तीमत्वाच्या असतात. स्वभावाने मनमिळावू असतात. दुसऱ्याची मदत करण्यात पुढे असतात. वाद विवादापासून दूर असतात.

काळा रंग

काळा रंगात दुसरा कुठलाही रंग उठून दिसत नाही. यामुळे काळा रंग आवडणाऱ्या व्यक्तीही स्वभावाने कठोर परिश्रम करणाऱ्या असतात. इतरांपेक्षा पुढे जाणे यांना चांगलेच अवगत असते. विचाराने प्रगल्भ आणि परंपरावादी असतात.

गुलाबी रंग
गुलाबी रंग हा मुलींचा आवडता रंग . भावना व्यक्त करणारा रंग म्हणून गुलाबी रंग ओळखला जातो. गुलाबी रंगाला आनंद देणारा आणि मन प्रसन्न करणारा रंग म्हणूनही ओळखले जातं. हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रसन्न , समजूतदार व्यक्तीमत्वाच्या असतात.

निळा रंग
निळा रंग ही मुलांच्या आवडीचा असतो. हा रंग मजेत जगण्याचा संदेश देतो. त्यामुळे निळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या मनमोकळ जगणं पसंत करतात. त्यांना बंधनात राहण आवडत नाही.

पिवळा रं
जगा आणि जगू द्या या उक्तीवर जगण्याचा संदेश हा रंग देतो. या व्यक्तींना आनंदी राहायला आवडतं. यामुळे दुसऱ्या व्यक्तीतही या आनंद शोधतात. हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -