या ‘५’ राशींसाठी शुक्राचे भ्रमण ठरणार लाईफ चेंजर

शुक्र ग्रह १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आपले स्थान बदलणार आहे. शुक्र सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा ग्रह आहे.

शुक्र ग्रह १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आपले स्थान बदलणार आहे. शुक्र सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. शुक्राला प्रेम आणि सौंदर्यांच प्रतिकही मानलं जातं. जेव्हा एखाद्या राशीत शुक्राची स्थिती उत्तम असते तेव्हा संबंधित राशीच्या व्यक्तींना सुख संपत्ती आणि समृद्दीबरोबर भौतिक सुख प्राप्त होते.

मेष राशीत आधीच राहू विराजमान आहे. वैदीक शास्त्रानुसार राहू हा भोग आणि विलासासाठी ओळखला जातो. त्यातच जर शुक्र आणि राहूमध्ये गुरु शिष्याचाही संबंध आहेच. यामुळे १२ मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणाऱ्या शुक्रामुळे या राशीच्या व्यक्तींना सुख, समृद्धीबरोबरच भौतिक सुखाचे दिवस लाभणार आहेत.

मेष… शुक्राचे हे स्थलांतर मेष राशीच्या लग्न भावात होत आहे. हे मेष राशीवाल्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे मेष राशीचे व्यक्तीमत्वच बदलणार असून त्यावर सकारात्म बदलांचा प्रभाव असणार आहे. कुटुंबाची उत्तम साथ यादरम्यान मेष राशीला भेटणार आहे. व्यवसायात आर्थिक प्रगती, प्रसिद्धीबरोबरच प्रेम संबंध अधिक दृढ करणारा हा काळ आहे.

मिथुन- मिथुन राशीसाठी हे भ्रमण ११ व्या भावात होणार आहे. शुक्र आणि राहूच्या युतीमुळे मिथुन राशीला प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करता येणार आहे. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. रेंगाळलेली कामे मार्गावर लागणार आहेत.अडकलेले पैसे मिळणार आहेत. मिथुन राशीसाठी भौतिक सुख संपत्ती प्रदान करणारा हा काळ असणार आहे.

सिंह- शुक्राचे हे स्थलांतर सिंह राशिवाल्याच्या नवव्या भावात होत आहे. तर या स्थानात आधीच राहू मुक्कामी असल्याने याचे उत्तम परिणाम सिंह राशीवर होणार आहेत. फक्त घाईघाीत कुठलाही निर्णय घेऊ नका. स्व:ता वर संयम ठेवणे गरजेचे आहे. जर नोकरी बदलण्याचा विचार असेल तर ट्राय करा. भावंडामधील जवळीक वाढणार आहे.

धनु- शु्क्राचे भ्रमण धनु राशीच्या पंचम भावात होत आहे. धनु राशीवर याचे चांगले परिणाम होणार आहेत. विवाहीतांसाठी शु्क्राचे स्थलांतर लाभदायक ठरणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीनेही सिंह राशीसाठी शुक्राचे हे भ्रमण उत्तम आहे. जुने वाद संपुष्टात येणार आहेत. सिंह राशीसाठी पैसा कमावण्याचे दिवस सुरू झाले आहेत.

मीन-शु्क्राचे भ्रमण मीन राशीच्या द्वितीय भावात होत आहे. यामुळे मीन राशीला अचानक लाभ होणार आहे. सासऱच्या व्यक्तींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.