Vastu Tips : चुकूनही देवघरात ‘या’ दिशेला ठेवू नका दिवा, अन्यथा होईल नुकसान

पूजा करताना मंदिरातील दिवा कोणत्या दिशेला लावलेला असावा, हे जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या दिशेला देवघरात दिवा लावला तर तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वास्तू शास्त्रात नियमीत दिनचर्येच्या कामांतील बदलांव्यतिरिक्त माणसाच्या स्वभावापासून ते त्याचं बोलणं, बसणं, उठणं यांसारख्या अनेक गोष्टींचे वर्णन सांगण्यात आले आहे. याशिवाय घरातील पूजा-पाठ यांचे देखील काही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तू शास्त्रानुसार, देवी-देवतांची पूजा करताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असणं महत्त्वाचे आहे. कारण, पूजेच्या गोष्टी पूजेदरम्यान व्यवस्थित एका जागी न ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेची कमतरता जाणवते. शिवाय केलेल्या पूजेचे योग्य फळ देखील आपल्याला मिळत नाही. याचंप्रकारे पूजा करताना मंदिरातील दिवा कोणत्या दिशेला लावलेला असावा, हे जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या दिशेला देवघरात दिवा लावला तर तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या दिशेला चुकूनही लावू नका दिवा

 • दक्षिणेकडे दिवा
  वास्तू शास्त्रानुसार, दक्षिण दिशेला कधीही दिव्याचे तोंड करून ठेवू नका, कारण या दक्षिण दिशेला तुम्ही दिव्याचे तोंड करून ठेवले तर तुम्हाला धनहानिचा सामना करावा लागू शकतो. कारण दक्षिण दिशेला यमराजांची दिशा मानली जाते. त्यामुळे चुकूनही कधी या दिशेला दिव्याचे तोंड करून ठेवू नका.

या दिशेला दिव्याचे तोंड केल्यास मानले जाते शुभ

 • पूर्व दिशेचा दिवा
  हिंदू मान्यतेनुसार, पूर्व दिशेला दिव्याच्या वातीचे तोंड करणे शुभ मानले जाते. या दिशेला दिव्याचे तोंड असल्यास कुटुंबातील व्यक्तींचे आयुष्य वाढते.
 • पश्चिमेकडील दिवा
  वास्तू शास्त्रानुसार, पश्चिमेकडे दिव्याचे तोंड करून ठेवणं शुभ मानले जाते. तसेच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होतो.
 • उत्तर दिशेचा दिवा
  उत्तर दिशेकडे लावलेला दिवा देखील अत्यंत शुभ मानला जातो. वास्तू शास्त्रानुसार, उत्तरेकडे दिव्याचे तोंड करून ठेवल्यास धन लाभ होतो.

हेही वाचा :http://Vat Purnima 2022 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार वट पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त