घरक्राइमरेल्वे छतावरची सेल्फी जीवावर बेतली; झारखंडमध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यू

रेल्वे छतावरची सेल्फी जीवावर बेतली; झारखंडमध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Subscribe

सेल्फीच्या नादापाई एका १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हल्ली सेल्फीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आजची तरुण पिढी बाहेर कुठेही फिरायला गेली की, सेल्फी काढल्याशिवाय राहत नाही. परंतु, याच सेल्फीच्या नादापाई बऱ्याच तरुणांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. उभ्या असलेल्या मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढण्याच्या नादात एका अल्पवयीन तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

नेमके काय घडले?

झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील छितरपूरचा रहिवासी सत्यम सोनी (१६) आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळत असताना तो आणि त्याचे मित्र दक्षिण-पूर्व रेल्वेच्या रामगढ-मुरी रेल्वेच्या भागात येणाऱ्या मायल रेल्वे स्थानकाजवळ दाखल झाले. त्याच दरम्यान, त्यांनी स्थानकावर उभ्या असलेल्या एका पेट्रोलियम टँकर असणाऱ्या मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी घेण्याचे ठरवले. सोनी सेल्फी घेण्यासाठी मालगाडीच्या छतावर चढला. त्याच दरम्यान, रेल्वेच्या वरच्या बाजुला असलेल्या २५ हजार हायवोल्टेज तारेला चिकटला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक आर. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान, हा तरुण हायटेन्शन ओव्हरहेड तारेच्या संपर्कात आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे.


हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, सहाजण ताब्यात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -