घरताज्या घडामोडीउरणमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वातीन लाखांचा गंडा

उरणमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वातीन लाखांचा गंडा

Subscribe

या लिंकवर जाऊन ४ हजार ६०० रुपये युपीआय मार्फत त्यांनी भरले.

व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज पाठवून ई-कॉमर्समध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज मिळेल असे सांगून बँकेतून परस्पर ३ लाख २५ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उलवे येथे घडली. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिदिवेष त्रिलोचन सातोपती असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना एके दिवशी मेसेज आला आणि तुम्ही जर ई-कॉमर्स मार्केटिंगमध्ये ५ हजारांची गुंतवणूक केली तर रोज ६०० ते ९०० रुपये कमवू शकता असे सांगितले. त्यांच्या या आकर्षक योजनेला भूललेल्या त्रिदिवेष यांना एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर जाऊन ४ हजार ६०० रुपये युपीआय मार्फत त्यांनी भरले. त्यानंतर दोन तासांनी पैसे मिळतील असा मेसेज पाठवून बँकेच्या अकौंटची माहिती देण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर त्यांना त्यांच्या बँकत फायदा म्हणून ४ हजार १९८ रुपये पाठविण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी त्रिदिवेष हे किराणा सामानाचे बिल ऑनलाईन भरायला गेले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या बँकेच्या दोन्ही खात्यांतून ३ लाख २५ हजार ४०० रुपये काढण्यात आले आहेत. त्यामुळे आपली मोठी फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘जनतेला वेठीस न धरता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कोर्टाच्या आदेशानंतर पुढचा निर्णय घेऊ’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -