घरताज्या घडामोडीबॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच शनाया कपूरने सांगितले Star Kids असण्याचे तोटे

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच शनाया कपूरने सांगितले Star Kids असण्याचे तोटे

Subscribe

लोक तुमच्या प्रत्येक कामावर तुम्हाला जज करतात. मात्र त्यांचे बोलणे कितपत मनावर घ्यायचे हे आपल्यावर आहे

सध्या आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून संपूर्ण बॉलिवूड हादरुन गेले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या सगळ्या स्टार किड्सची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान बॉलिवूडच्या काही स्टार्सनी आपल्या मुलांना परदेशात पाठवल्याच्या चर्चा देखील पहायला मिळत आहेत. अशातच अभिनेता संजय कपूरची ( Sanjay Kapoor) मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिने एक स्टार किड्सच्या असल्याने किती ड्रॉव्ह बॅक्स आहेत याविषयी भाष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनाया कपूर लवकरच करण जोहरच्या अपकमिंक सिनेमात ड्यबू करताना दिसणार आहे. एका मुलाखती दरम्यान शनायाने स्टारकिड्स असल्याच्या फायद्या आणि तोट्यांविषयी भाष्य केले आहे.

शनायाने म्हटले आहे की, ‘मी एका अभिनेत्याची मुलगी असल्याने मी जे काम सुरू करते त्यावर जजमेंट केले जात आहे. मात्र मी या गोष्टींकडे सकारात्मकरित्या पाहते. मला नेहमी प्रोत्साह देणाऱ्या लोकांकडे मी फोकस करते. सोशल मीडियावर देखील मला फॉलोवर्सचे प्रेम आणि सपोर्ट मिळत आहेत. या कारणामुळे मी पॉझिटिव्ह राहू शकत आहे. स्टॉर किड्स असल्याचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. लोक तुमच्या प्रत्येक कामावर तुम्हाला जज करतात. मात्र त्यांचे बोलणे कितपत मनावर घ्यायचे हे आपल्यावर आहे.’

- Advertisement -

शनाया कपूरने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमाच्या सेटवर असिस्टंट म्हणून काम केले आहे. या सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत होती. शनायाने आपल्या कामाच्या अनुभवांविषयी सांगताना म्हटले की, मला या क्षेत्रात काम करताना खूप चांगले अनुभव मिळत आहेत. असिस्टंट म्हणून काम केल्यामुळे मला सिनेक्षेत्रात कसे काम केले जाते, सेटवर कसं वातावरण असते हे सगळ मला शिकायला मिळाले.


हेही वाचा – सुष्मिता सेन पहिल्यापासून माझी प्रेरणास्रोत – नवदीप कौर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -