घरताज्या घडामोडीLive Update : मुंबईतील धारावी कोरोनामुक्त, गेल्या २४ तासात एकही रुग्ण सापडला...

Live Update : मुंबईतील धारावी कोरोनामुक्त, गेल्या २४ तासात एकही रुग्ण सापडला नाही

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये गेल्या २४ तासात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. सध्या धारावीत ११ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेना नेत्यांची दहशत, राष्ट्रीय महामार्गासाठी वाशिममध्ये लोकलप्रतिनिधींकडून अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार

- Advertisement -

अखेर काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यसह अन्य काँग्रेस नेत्यांचेही अकाऊंट अनलॉक करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित


मुंबई विद्यापीठात बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या मुंबई विद्यापीठात परीक्षांच्या निकालाच कामकाज सुरु आहे. धमकी आल्याची तक्रार मुंबई पोलीसांत करण्यात आली आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


राज्यपालांची १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातील भूमिका राजकीय – राऊत

राज्यपालांवर दबाव आहे – संजय राऊत
हा सगळा खेळ ठरवून चालला आहे. घटनात्मक पदाचं अवमुल्यन होत आहे.
राज्यपालांनी दबाव झुगारायला हवा (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिल करा)


देशात २४ तासात ३८ हजार ६६७ कोरोनाबाधितांची नोंद, ३५ हजार रुग्णांची कोरोनावर मात


कोपरखैरणेत सराईत गुन्हेगाराचा संशयास्पद मृत्यू, चोरट्याला पकडून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होते. चोरी करण्यास घरात घुसला आणि त्याच घरात झोपला असल्यामुळे नागरिकांनी चोप देऊन पोलिसांकडे सोपवले होते. या चोराचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे.


माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत

माजी वनमंत्री आणि शिवसेना नेते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिलेनं केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -