घरCORONA UPDATEभयंकर! रेल्वेने प्रवासी मजुरांना दिलं बुरशी आलेलं जेवण!

भयंकर! रेल्वेने प्रवासी मजुरांना दिलं बुरशी आलेलं जेवण!

Subscribe

प्रवासी मजुरांना घेऊन जाणारी एक ट्रेन केरळवरून दानापुरा येथे निघाली होती.

देशात वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी रेल्वेकडून देण्यात आलेलं जेवण खिडकीबाहेर फेकून दिलेलं दिसत आहे.

- Advertisement -

प्रवासी मजुरांना घेऊन जाणारी एक ट्रेन केरळवरून दानापुरा येथे निघाली होती. सोमवारी ही ट्रेन पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर पोहचली. या स्टेशनवर पोहचताच मजुरांना जेवण आणि पिण्याचे पाणी देण्यात आले. पण व्हिडिओत दिसत आहे की, लोकांनी त्यांना दिलेलं जेवण खिडकीबाहेर टाकून दिलं आहे आणि घोषणाबाजी पण केली.

यावेळी रेल्वेतील काही मजुरांचे म्हणणे आहे की, केरळवरून पश्चिम बंगालला पोहचेपर्यंत त्यांना चांगलं जेवण देण्यात आलं होतं. मात्र बंगालमध्ये पोहचताच त्यांना दिलेल्या जेवणामुळे ते आजारी पडू शकतात. कारण त्यांना दिलेल्या जेवणाला वास येत होता. जेवण पुर्ण खराब झालेलं होतं.

- Advertisement -

या घटनेवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे जितेंद्र तिवारी यांनी रेल्वेला जबाबदार धरलं आहे. ते म्हणालेत, रेल्वेकडे काम करण्याची तयारी नाहीये. रेल्वेचं कोतुक करणारे फोटो किंवा व्हिडिओ असतात तेव्हा रेल्वे कौतुक करून घेते. मात्र आता खराब अन्न दिल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत तर त्यावर रेल्वेकडून कोणतीच प्रतिक्रीया येत नाहीये. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावरही आरोप लावले आहेत.


हे ही वाचा – सेक्सच्या बदल्यात डिग्री; महिला प्रोफेसरला ११ महिन्यानंतर जामीन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -