घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासात ७१८ जणांनी केली कोरोनावर मात

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ७१८ जणांनी केली कोरोनावर मात

Subscribe

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. विवेक पाटील यांची अटक करण्याबाबत ईडीने पत्र काढले. त्यानंतर ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती ईडीने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.


राज्यात कोरोना विषाणुची दुसरी लाट आटोक्यात येत असून रुग्णसंख्येतही मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. आज राज्यातील नव्या कोरोना रुग्णपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९, ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबर आज १५ हजार १७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आज वाढल्याचे दिसून आले आहे. सोमवारी मुंबईत ५२९ नव्या रूग्णांचे निदान करण्यात आले होते. मात्र हा आकडा आज वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासात ५७५ नवे बाधित आढळले असून १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह गेल्या २४ तासात ७१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

पुण्यात दिवसभरात २४६ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह पुण्यात कोरोनाबाधित २१ रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील ११ जणांनी आपला प्राण गमावला आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या २ हजार ७७३ इतकी झाली आहे.


मोठा दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी धारावीत एकही कोरोना रूग्ण नाही

धारावीत सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. धारावीत सध्या कोरोनाचे ११ अॅक्टिव्ह रूग्ण


सोमवारी एनसीबी मुंबईने एकूण ४.४० लाख रुपयांच्या एकूण १७.३ किलो चरस जप्त केला. आणि आज ७ जणांना अडविले असून त्या आरोपींची चौकशी केली जात आहे, असे एनसीबीकडून सांगितले जात आहे.


कोरोनाच्या डेल्टा+ व्हेरिएंटचे स्वरूप अद्याप चिंताजनक नाही, मार्चपासून आलेल्या या व्हेरिएंटवर लक्ष असून त्याचे परिक्षण होणे देखील आवश्यक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


सांगलीत कृष्णा नदीच्या काठी अजस्त्र मगरीचे आज दर्शन झाले. सकाळी सातच्या सुमारास सांगलीतल्या नवीन पुलाजवळ १३ फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. नदी शेजारी ही मगर दिसली. काही वेळाने ती पुन्हा कृष्णा नदी पात्रात गेली. भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.


मुंबई पूर्व उपनगरातील ‘एस’ विभागातील भांडुप, विक्रोळी (पश्चिम) परिसरातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची आणि त्यामध्ये जीवित वा वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने जागा खाली करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


हज कमिटी ऑफ इंडियाकडून हज २०२१चे सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत.


राजापूरात पूरजन्य परिस्थितीसाठी NDRFसज्ज


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश देऊन स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठीत समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


परदेशात जाणाऱ्या विद्यार्थांना कोविशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसांनी घेत येणार


पुढील २-३ तासात कुलाबा,सीएसटी, वरळी आणि पनवेलसह काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पंजाबमध्ये अकाली दल रत्त्यावर, आरोग्यमंत्र्यांना हटवण्याची मागणी


आरटीआर कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर सुनावणी पूर्ण


राज्याच्या हातातील प्रश्न सोडवायची मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची तयारी आहे – अजित पवार


साखर कारखान्यांच्या गोदामावर सोलार पॅनेल बसवण्याच्या मुद्द्यावर चर्चा – अजित पवार


कंगना रणौतला देशद्रोहाच्या आरोपामुळे प्राधिकरणाचा पासपोर्ट नुतणीकरणास नकार दिल्याने कंगनाने बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कंगनाला दिलासा देण्यासाठी कोर्टाचा नकार दिला आहे. कंगनाने चुकीची याचिका दाखल केल्याचे कोर्टाने म्हटले आहे.


आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत लसीकरणाचा शुभारंभ. विलेपार्ले येथे रहिवाशांचे मोफत लसीकरणाला सुरुवात


मराठा समाज शांततेत आंदोलन करेल – संभाजीराजे छत्रपती


आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे – संभाजीराजे छत्रपती


आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कोणालाही उलटंसुलटं बोलू नये – संभाजीराजे छत्रपती


लोकप्रतिनिधींनी आता बोलायला पाहिजे. आत लोकप्रतिनिधींची जबाबदारी.


कोल्हापूरात उद्या मूक आंदोलन – संभाजीराजे छत्रपती


राज्यात आजपासून शाळा सुरु. शाळा कशा सुरु करणार याबाबत मात्र अस्पष्टता आहे.


 

देशात गेल्या २४ तासात ६० हजार ४७१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २,७२६ रुग्णांचा मृत्यू मृत्यू झालाय. देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.


कोरोना काळात मिळणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ७० हजार आशा वर्कर्स संपावर आजपासून संपावर जाणार आहेत. महिन्याला पाच हजार रुपये भत्ता देण्याची मागणी आशा कर्मचारी कृती समितीने केली आहे


नाशिकमध्ये कोरोनानंतर आता चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचा फैलाव झाला आहे. नाशिकमध्ये सध्या चिकनगुनियाचे ३६ रुग्ण सापडले आहेत. तर डेंग्यूचे ६५ रुग्ण. नाशिकमध्ये स्वच्छता राखण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.


देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कंगनाच्या पासपोर्ट नुतनीकरणाला प्राधिकरणाने नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -