Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Corona: कोरोनामुळे जगातील १५ लाख मुलांचं पालकांचं छत्र हरपलं

Corona: कोरोनामुळे जगातील १५ लाख मुलांचं पालकांचं छत्र हरपलं

भारतात मार्च २०२१ पासून ते एप्रिल २०२१ या कालावधीत अनाथ अश्रमातील मुलांची संख्येत ८.५ टक्क्यांनी वाढ

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटामध्ये जगात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. अनेक नागरिकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील ४१ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत १५ लाख मुलांनी आपल्या आई-वडील किंवा यापैकी एकाला गमावले आहे. द लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासातून हे समोर आले आहे. भारतामध्ये मार्च ते एप्रिल या महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत.

या नव्या अभ्यासानुसार, भारतात १ लाख ९० हजार मुलांचे कोरोनामुळे पालकांचं छत्र हरपलं आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या १४ महिन्यांमध्ये १० लाखांहून अधिक मुलांनी आई-वडील किंवा यामधील एकाला कोरोनामुळे गमावले आहे. तर ५० हजार मुलांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आजी-आजोबांना कोरोनामुळे गमावले आहे. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार भारतात मार्च २०२१ पासून ते एप्रिल २०२१ या कालावधीत अनाथ अश्रमातील मुलांची संख्येत ८.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच यामुळे अनाथ मुलांची संख्या आता ५ हजार ०९१ वरुन थेच ४३ हजार १३९ झाली आहे. ज्या मुलांनी आपल्या आई-वडीलांना गमावले त्यांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर तज्ज्ञांनी या मुलांबाबत आजार, शारीरिक शोषण, लैंगिक शोषण, किशोर गर्भवस्था सारख्या संकटांबाबत काळजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन कोविड-१९ रिस्पॉंस टीमच्या प्रमुख लेख डॉ सुसान हिलिस यांनी म्हटलं आहे की, आम्ही केलेल्या सर्व्हेमध्ये असं आढळले आहे की, ३० एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनामुळे जगभरात ३० लाख लोाकांचा मृत्यू झाला यामुळे १५ लाख मुले अनाथ झाले आहेत. भारतामध्ये मार्च २०२१ पासून ते एप्रिल २०२१ दरम्यान अनाथ आश्रममध्ये मुलांची संख्या ८.५ पटीने वाढली आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. यादरम्यान अनाख मुलांची संख्या ५ हजार ९१ वरून ४३ हजार १३९ झाली आहे.

- Advertisement -