घरताज्या घडामोडी'या' व्यावसायिकाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत थाळीचा उपक्रम केला सुरू

‘या’ व्यावसायिकाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत थाळीचा उपक्रम केला सुरू

Subscribe
कल्याणातील देशपांडे कॅटरर्स या व्यावसायिकाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोफत थाळी देण्याचा उपक्रम सुरू केला असून उर्वरित नागरिकांसाठी अवघ्या २० रुपयात थाळी सुरू केली आहे. कोरोनाकाळात लोकांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या व्यावसायिकाने पुढाकार घेत सामाजिक बांधलकी जपल्याचे दिसून आले आहे.
कल्याण मधील देशपांडे कॅटरर्स तर्फे लॉकडाऊन काळात दररोज शेकडो नागरिकाना मोफत अन्नवाटप करण्यात आले मार्च महिन्यापासून त्यांचा हा उपक्रम सुरू होता. दरम्यानच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे. गेल्या महिन्याभरापासून काही अंशी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असल्याने हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी आज  बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तर आजही देशपांडे कॅटरर्स तर्फे मोफत जेवण दिले जात आहे.
याबाबत देशपांडे कॅटरर्सचे संचालक संतोष देशपांडे यांनी सांगितले, लॉकडाऊन शिथिल करण्यात आला तरी आजच्या घडीला अनेक नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या नागरिकांना पोटभर जेवण मिळावे म्हणून २० रुपयात थाळी हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच कोरोना काळात जीवावर उदार होऊन कार्यरत असलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत जेवण दिले जात आहे. दरम्यान त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -