घरCORONA UPDATECorona Live Update: आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा; आज देशात ६३ हजार ६३१ रूग्ण...

Corona Live Update: आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा; आज देशात ६३ हजार ६३१ रूग्ण कोरोनामुक्त

Subscribe

भारत लवकरच कोरोना लस पोर्टल घेऊन येणार असल्याचे आयसीएमआरने सांगितले.

- Advertisement -

मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार १३४ नव्या रूग्णांची वाढ झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एका दिवसांत तब्बल १ हजार १०१ जणांनी कोरोनावर मात केली असून मुंबईतील रिकव्हरी रेट हा ८१ टक्क्यांवर आला आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नव्या रूग्णांची भर पडली असून २९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ६१ हजार ९४२ इतकी झाली आहे. तर ४ लाख ८० हजार ११४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


देशात आज आतापर्यंतचे सर्वाधिक ६३ हजार ६३१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती एएनआय डिजिटल ट्विटच्या माध्यमातून समोर येत आहे. तसेच गेल्या २४ तासांत १० लाख कोविड १९ चाचण्या असल्याचेही सांगितले जात आहे.


खान्देशातील सर्वात तरुण आमदार ठरलेले मंगेश रमेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.


जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जळगाव येथील चाळीसगाव मधील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु त्यांना कोरोना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच क्वारंटाईन झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात २८८ कोरोनाबाधित पोलीस आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १३ हजार ४६८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १३८ पोलिसांचा मृत्यू झाला असून १० हजार ८५२ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ हजार ४७८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६९ हजार ८७८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९४५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २९ लाख ७५ हजार ७०२वर पोहोचला आहे. म्हणजेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ३० लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आतापर्यंत यापैकी ५५ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २२ लाख २२ हजार ५७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ९७ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


देशात २१ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ४४ लाख ९१ हजार ७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख २३ हजार ८३६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात २ कोटी ३१ लाख ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८ लाख २ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी ५७ लाख ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी सध्या सरकार चाचण्या अधिक भर देत आहे. गेल्या २४ तासांत देशात १० लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ७४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा असून राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्ण Active आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -