घरताज्या घडामोडीपेण-पनवेल रेल्वे सुरू करण्याची मागणी; योगेश म्हात्रे यांचा आत्मदहनाचा इशारा

पेण-पनवेल रेल्वे सुरू करण्याची मागणी; योगेश म्हात्रे यांचा आत्मदहनाचा इशारा

Subscribe

पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमु ही प्रवासी शटल सेवा पूर्ववत करण्यासाठी, तसेच पेण आणि रोहे स्थानकातून ईएमयु किंवा मेमु ही छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड आणि डहाणू रोड ही प्रवासी रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याचे निवेदन मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे.तातडीने ही सेवा सुरू न केल्यास पेण-पनवेल मेमुच्या वाढदिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ‘मी पेणकर, आम्ही पेणकर’ शाश्वत समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी या निवेदनात दिला आहे. यापूर्वी पेण-पनवेल शटल सुरू करण्यासाठी पेणकरांनी एकत्र येऊन ‘मी पेणकर, आम्ही पेणकर’ नावाने समिती स्थापन करून उभारलेल्या एल्गारमुळे ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वपक्षीय राजकीय पुढारी मात्र हिरवे झेंडे दाखविण्यात अग्रक्रमावर होते, मग हे पुढारी आता पुन्हा ही सेवा सुरू करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

पेणकरांनी अनेकदा आंदोलन, उपोषण केल्यानंतर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पेण-पनवेल शटल सेवा सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर ही सेवा देखील बंद झाली होती. मात्र आता सर्व व्यवहार, सर्व सेवा पूर्वपदावर येत असल्याने आता बंद ठेवण्यात आलेली पेण-पनवेल शटल सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात यावी, त्याचबरोबर पेण-पनवेल-दिवा, वसई रोड, डहाणू रोड ही प्रवासी मेमु रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरू व्हावी, पेण-ठाणे ही प्रवासी रेल्वे सेवा शनिवार आणि रविवारी देखील उपलब्ध व्हावी,अलिबाग रेल्वे मार्ग प्रवासी मार्गासाठी सुरू करण्यात यावा, रोजच्या जलद सेमी आणि फास्ट, सुपर फास्ट गाड्यांना येथे स्थानकात थांबा मिळावा, गणपती, दिवाळी, होळी सुट्टी विशेष गाड्यांना पेणसह रोहे रेल्वे स्थानकात दोन मिनिटांचा थांबा मिळावा, पेणसह पनवेल, खोपोली, रोहे, कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सर्व मध्य रेल्वे स्थानकात प्रवासी विश्रांती गृह, स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रवासी नागरिक सहाय्यता केंद्र उभारावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – अखेर ठरलं! अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबरचा मुहूर्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -